मुंबई, 04 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Bollywood Actress Alia Bhatt) चित्रपटांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका साकारून अल्पावधीतच मोठं यश मिळवलं आहे. राझी, उडता पंजाब, हायवे, गली बॉय, बद्रिनाथ की दुल्हनिया, 2 स्टेट्स आणि डिअर जिंदगी या चित्रपटांमधल्या तिच्या भूमिका अविस्मरणीय आहेत. लवकरच आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच या सिनेमाचा दमदार ट्रेलरही (Gangubai Kathiawadi Trailer) लाँच झाला आहे. या चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी सातत्याने चर्चा होत आहे. आलिया भट्ट या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असेल. अभिनेते आणि अभिनेत्री प्रत्येक भूमिका साकारण्यासाठी विशेष परिश्रम घेत असतात. आलियानेदेखील गंगूबाईची भूमिका साकारण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. काही मीडिया अहवालांच्या मते, ही भूमिका वास्तवदर्शी आणि अधिक चांगली व्हावी, यासाठी आलियाने बराच काळ मुंबईतला रेड लाइट एरिया असलेल्या कामाठीपुरामधल्या सेक्स वर्कर्ससोबत घालवला होता.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित (Sanjay Leela Bhansali Gangubai Kathiawadi)आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप प्रशंसा होत असून, आलियाचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटात आलिया मुंबईतली प्रसिद्ध माफिया आणि सेक्स वर्करची (Sex Worker) भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी आलियानं विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटात आलिया भट्टसह अजय देवगण, सीमा पहवा, हुमा कुरेशी आणि विजय राज महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 6 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणार होता; मात्र कोरोनामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. आता हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. हे वाचा- सुजॉय घोष यांच्या चित्रपटात दिसणार करीना कपूर, काय असणार या ‘कहानी’चा सस्पेन्स आलियाच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचं झालं, तर ती ‘गंगूबाई काठियावाडी’व्यतिरिक्त राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा RRR, तसंच रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र आणि रणवीर सिंहसोबत रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गंगूबाईच्या भूमिकेच्या तयारीसाठी आलियाने मुंबईच्या रेड लाइट एरियातल्या कामाठीपुरा इथल्या सेक्स वर्कर्ससोबत बराच वेळ घालवला. हे पात्र कामाठीपुऱ्यातल्या सेक्स वर्कर्सप्रमाणे दिसावं आणि त्यांच्याच भाषेत बोलताना दिसावं, यासाठी आलियाने या सर्व गोष्टी केल्या. 60च्या दशकात माफिया असलेल्या गंगूबाईदेखील कामाठीपुऱ्यात वास्तव्यास होत्या. या भूमिकेसाठी आलियाने घेतलेले परिश्रम पाहता, हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणारा ठरत आहे.

)







