मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ट्रोलर्सचा सामना करण्यासाठी सनी लियोनीकडे आहे खास मंत्र, म्हणाली....

ट्रोलर्सचा सामना करण्यासाठी सनी लियोनीकडे आहे खास मंत्र, म्हणाली....

सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलिंग ही सध्या अगदी सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यात सेलिब्रिटिंना तर अगदी सहज आणि कित्येकदा क्षुल्लक कारणावरून ट्रोल केलं जातं.

सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलिंग ही सध्या अगदी सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यात सेलिब्रिटिंना तर अगदी सहज आणि कित्येकदा क्षुल्लक कारणावरून ट्रोल केलं जातं.

सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलिंग ही सध्या अगदी सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यात सेलिब्रिटिंना तर अगदी सहज आणि कित्येकदा क्षुल्लक कारणावरून ट्रोल केलं जातं.

    मुंबई, 4 मार्च-   सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलिंग ही सध्या अगदी सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. त्यात सेलिब्रिटिंना तर अगदी सहज आणि कित्येकदा क्षुल्लक कारणावरून ट्रोल केलं जातं. बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटिंना तर बहुतेक रोजच ट्रोलचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तर काहीही विचार केल्याशिवाय विनाकारण या सेलिब्रिटिवर टीका केली जाते. याला काहीजण उत्तरं देतात तर काहीजण पूर्णपणे दुर्लक्ष करतात. बॉलिवूडमधली बोल्ड अभिनेत्री सनी लिओन (Sunny Leone) हिनंही सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि निगेटिव्हिबाबत एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर ट्रोलिंगचा (Sunny Leone Troll) सामना करण्यासाठी ती काय खास मंत्र वापरते तेही तिनं सांगितलं आहे.

    ट्रोल्सना ब्लॉक करून आपण त्याचा सामना करतो असं सनी लिओनीनं सांगितलं. ट्रोल माझ्या आयुष्याचा भाग नाहीत त्यामुळे मी त्याला काहीही महत्त्व देत नाही त्यामुळे मला ट्रोलर्सच्या वक्तव्यांचा काहीच फरक पडत नाही,असंही तिनं स्पष्ट केलं. जेव्हा एखादा सोशल मीडिया युजर कोणालाही ट्रोल करतो तेव्हा त्या युजरचा उद्देश फक्त लक्ष वेधून घेण्याचाच असतो, असं मत तिनं व्यक्त केलं आहे. ती म्हणाली, ‘ट्रोल्स करणारे मेसेजेस न वाचणं आणि त्यांना ब्लॉक करणं हाच माझा ट्रोल्सशी सामना करण्याचा मंत्र आहे.’

    ‘हे सगळं का होतं याच्या कारणांचाही विचार झाला पाहिजे. अगदी साधी गोष्ट आहे, ते फक्त मला ट्रोल करून थांबत नाहीत. माझ्यानंतर दुसरीकडे जातात, त्यांना ट्रोल करतात. त्यांना फक्त त्यांच्याकडे लक्ष वेधून घ्यायचं असतं. त्यांची नोंद घेतली पाहिजे इतकाच त्यांचा उद्देश असतो. अगदी एखादं लहान मुलं जसं त्याच्याकडे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात,तसंच हे आहे. जेव्हा ते असं वाईट काम करतात तेव्हा त्यांच्याकडे आपोआपच लक्ष जातं, त्यांचा हाच तर उद्देश असतो,’ असंही सनी म्हणते.

    ज्या सेलिब्रिटिज सगळ्यांत जास्त लोकप्रिय असतात, ज्यांचा जास्त प्रभाव असतो त्यांनाच जास्त ट्रोल केलं जातं असं सनी लिओनचं म्हणणं आहे. ‘ट्रोलर्स एका सेलिब्रिटीला ट्रोल करतात मग दुसऱ्या सेलिब्रिटीकडे वळतात, त्यांनाही ट्रोल करतात. सेलिब्रिटीजना जास्तीत जास्त दु:ख होईल अशी वक्तव्यं, अशा सगळ्या गोष्टी ते करतात. ज्या व्यक्तींवर या ट्रोलचा परिणाम होईल आणि ते त्यांना उत्तर देतील अशाच व्यक्तीच्या शोधात हे ट्रोलर्स असतात. त्यामुळे ते सतत त्यांचा पाठलाग करत राहतात’, असंही त्यांचं म्हणणं आहे.

    (हे वाचा:किंसिंग सीन करायला लाजतो 'बाहुबली' फ्रेम प्रभास; पण या कारणामुळे देत नाही नकार )

    सनीनं तिचे फ्लॉप चित्रपट आणि चित्रपटांच्या प्रमोशनवर टीका करणाऱ्यांनाही कडक भाषेत उत्तर दिलं आहे. हे ट्रोल्स आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग नाहीत असं सांगून ती म्हणते,” कोणाला माझ्याबद्दल काय म्हणायचं आहे, कोणाचं माझ्याबद्दल काय मत आहे याची मला खरोखरच अजिबात पर्वा नाही. कारण ते माझ्या आयुष्याचा भाग नाहीत. ते माझी बिलं भरत नाहीत, ते जेवण करण्यासाठी माझी मदत करत नाहीत, ते मला मुलांची डायपर बदलायला मदत करत नाहीत, ते माझ्या आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीत मला मदत करत नाहीत. ते माझ्याबरोबर डिनरला येत नाहीत, ते माझं कुटुंब नाहीत, मित्र नाहीत, असे लोक माझ्यासाठी कुणीच नाहीत,” असंही ती म्हणते.

    आपल्या बोल्ड भूमिकांसाठी प्रसिध्द असणाऱ्या सनीला अनेकदा ट्रोल्स करण्यात आलं आहे. या ट्रोलर्समुळे आपल्यावर काहीही परिणाम होत नाही कारण आपण त्याला किंममतच देत नाही असं सांगून तिनं ट्रोलर्सची तोंडं बंद केली आहेत.

    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Social media, Social media troll, Sunny Leone