Home /News /entertainment /

किंसिंग सीन करायला लाजतो 'बाहुबली' फ्रेम प्रभास; पण या कारणामुळे देत नाही नकार

किंसिंग सीन करायला लाजतो 'बाहुबली' फ्रेम प्रभास; पण या कारणामुळे देत नाही नकार

'बाहुबली' (Bahubali) फेम साऊथ सुपरस्टार प्रभास (Actor Prabhas) सध्या त्याच्या आगामी 'राधे श्याम' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

    मुंबई, 4 मार्च- 'बाहुबली'   (Bahubali)  फेम साऊथ सुपरस्टार प्रभास   (Actor Prabhas)  सध्या त्याच्या आगामी 'राधे श्याम' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री पूजा हेगडेसोबत (Pooja Hegde) पीरियड रोमँटिक ड्रामामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो पूजा हेगडेवसोबत रोमान्स करतानासुद्धा दिसणार आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का प्रभास किसिंग सीन करताना अजिबात कम्फर्टेबल नव्हता  (Prabhas Not Comfertable In Kissing Scene),अभिनेत्याने स्वत: याचा खुलासा केला आहे. परंतु अशा चित्रपटात असे सीन नाईलाजाने द्यावे लागतात. प्रभास हा अत्यंत शांत आणि लाजाळू अभिनेता आहे हे अनेकदा सांगण्यात आलं आहे. नुकतंच या गोष्टीला अभिनेता प्रभासने स्वतः मान्य केलं आहे. 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लूजन' या चित्रपटांसाठी मोठ्या प्रमाणात शारीरिक परिवर्तन घडवून आणलेल्या प्रभासने अलीकडेच त्याच्या अस्वस्थतेबद्दल खुलासा केला आहे.प्रभासने सांगितले की त्याला चित्रपटात किसिंग करताना आणि शर्ट काढताना अस्वस्थ वाटते. परंतु चित्रपटाच्या मागणीमुळे त्याला नकार देता येत नाही'. प्रभासने नुकतंच पिंकविलाशी संवाद साधला, यादरम्यान त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. राधे श्याम या चित्रपटातील त्याच्या किसिंग सीनबद्दल बोलताना तो म्हणाला की, 'ही स्क्रिप्टची मागणी होती. ही एक लव्हस्टोरी आहे. त्यामुळे मला नकार देता आला नाही. लव्हस्टोरीमध्ये या गोष्टी टाळायचं असलं तरी टाळता येत नाही, कारण ती लव्हस्टोरीची गरज असते'. (हे वाचा:आदित्य नारायण-श्वेता अग्रवाल बनले आईबाबा, घरी गोंडस परीचं आगमन) राधा कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. राधे श्याममध्ये प्रभास आणि पूजा हेगडेसोबत तगडी स्टार कास्ट आहे. यामध्ये भाग्यश्री, सचिन खेडेकर, प्रियदर्शी पुलीकोंडा आणि मुरली शर्मा यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे एकाच वेळी तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे. 1970 च्या दशकात युरोपमध्ये सेट केलेला, हा चित्रपट विक्रमादित्य या हस्तरेषाकाराच्या आयुष्यावर आधारित आहे. कोरोना महामारीमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. या चित्रपटाची नवी रिलीज डेट काही दिवसांपूर्वीच समोर आली आहे. 11 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला होता.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Prabhas, South indian actor

    पुढील बातम्या