Home /News /sport /

ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहलीच्या मुक्कामासाठी खास तयारी; वाचा कसा असेल दौरा?

ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहलीच्या मुक्कामासाठी खास तयारी; वाचा कसा असेल दौरा?

विराट कोहलीची (Virat Kohli) 25 सदस्यीय टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीला पोहोचली आहे. भारतीय टीमला (Indian Cricket Team) शहराच्या आउटर भागात 14 दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये राहावं लागेल.

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : विराट कोहलीची (Virat Kohli) 25 सदस्यीय टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Team India's Australia Tour) सिडनीला पोहोचली आहे. भारतीय टीमला (Indian Cricket Team) शहराच्या आउटर भागात 14 दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. यादरम्यान टीमला सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टीम इंडियासह इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळणारे ऑस्ट्रेलियन स्टार डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, पॅट कमिन्स आदी देखील दुपारनंतर येथे पोहोचले. ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहलीसाठी हॉटेलमध्ये खास तयारी करण्यात आली आहे. न्यू साउथ वेल्स सरकारने टीम इंडियाला 2 आठवड्यांच्या आइसोलेशनदरम्यान सराव करण्याची परवानगी दिली आहे. टीम इंडिया ब्लॅकटाउन इंटरनॅशनल स्पोर्ट्स पार्कमध्ये सराव करतील. जे बायो सिक्युर एन्वॉरमेंटच्या स्वरुपात तयार करण्यात आला आहे. कॅप्टन कोहली एडिलेडमध्ये 17 ते 21 डिसेंबरदरम्यान आयोजित केलेल्या  डे-नाइट टेस्ट मॅचनंतर आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी भारतात परतणार आहेत. डेली टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार आयसोलेशनदरम्यान त्यांची अधिक काळजी घेतली जाईल. पुलमॅन हॉटलमध्ये टीम इंडियाचा मुक्काम भारतीय टीम पुढील दोन आठवड्यांपर्यंत पुलमॅन हॉटेलमध्ये थांबतील. येथे पहिल्यांदा न्यू साउथ वेल्सची रग्बी टीम थांबली होती. आता ते दुसऱ्या हॉटेलमध्ये गेले आहेत.  टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांनी भारतीय कॅप्टन थांबवण्यासाठी खास पेंटहाउस सूट्स देण्यात येईल. जेथे ऑस्ट्रेलियन रग्बी दिग्गज ब्रॅड फिटलर थांबतात. न्यू साउथ वेल्स सरकारने मर्यादीत संख्येत कुटुंबीयांना परवानगी दिली आहे. आणि खेळाडूंच्या कुटुंबाला आयसोलेशनच्या नियमांचे पालन करावे लागतील. हे ही वाचा-Live सामना सुरू असताना आला कोरोनाचा रिपोर्ट; First Half मध्ये खेळाडू क्वारंटाइन रेट्रो जर्सीमध्ये दिसणार टीम इंडिया आयपीएलनंतर यूएईतून परतणारे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर हे 22 नोव्हेंबरपासून राष्ट्रीय टीमच्या शिबिरात सहभागी होतील. ते वेगळं राहून तयारी करतील. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मर्यादीत ओव्हर्सची सीरीज 27 नोव्हेंबरपासून सिडनी आणि कॅनबरामध्ये खेळली जाईल. भारतीय क्रिकेटर पहिल्यांदा या दौऱ्यात मर्यादीत ओव्हर्सच्या सीरिजदरम्यान निळ्या रंगाची जर्सी घालतील, ज्यात खांद्यावर अनेक रंगाच्या रेषा असतील. भारतीय टीमने 1992 वर्ल्ड कपदरम्यान अशा स्वरुपाची जर्सी घातली होती. भारतीय टेस्ट टीमः विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शुभमन गिल, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, केएल राहुल, ऋद्धिमान साहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज. ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमः जो बर्न्स, विल पुकोव्स्की, स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर, ट्रॅविस हेड, मार्नस लाबूशेन, माइकल नेसेर, कॅमरोन ग्रीन, टिम पेन (कॅप्टन), मॅथ्यू वेड, सीन एबट, पॅट कमिंस, जोश हेजलवुड, नाथन लायन, जेम्स पॅटिंसन, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेप्सन. ऑस्ट्रेलिया-ए टीमः जो बर्न्स, मार्कस हॅरिस, निक मैडिंसन, विल पुकोव्स्की, ट्रॅविस हेड, मोएसिस हेनरिक्स, मिशेल मार्श, मिशेल नेसेर, एश्टन एगर, कॅमरोन ग्रीन, विल सदरलँड, एलेक्स कैरी, टिम पेन, सीन एबट, जॅक्सन बर्ड, हैरी कॉनवे, जेम्स पॅटिंसन, मार्क स्टेकेटी, मिशेल स्वेप्सन. भारत वनडे टीमः विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, मयंक अग्रवाल, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, केएल राहुल, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर. ऑस्ट्रेलिया वनडे आणि टी20 टीमः आरोन फिंच, स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर, मोएसिस हेनरिक्स, मार्नस लाबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, एश्टन एगर, कॅमरोन ग्रीन, डॅनियल सैम्स, एलेक्स कॅरी, मॅथ्यू वेड, सीन एबट, पॅट कमिंस, जोश हेजलवुड, केन रिचर्ड्सन, मिशेल स्टार्क, एडम जाम्पा. भारत टी20 टीमः विराट कोहली, शिखर धवन, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, केएल राहुल, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सॅनी, दीपक चाहर, टी नटराजन.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Team indian, Virat kohli

    पुढील बातम्या