मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Live सामना सुरू असताना आला कोरोनाचा रिपोर्ट; First Half मध्ये खेळाडूला केलं क्वारंटाईन

Live सामना सुरू असताना आला कोरोनाचा रिपोर्ट; First Half मध्ये खेळाडूला केलं क्वारंटाईन

एकामुळे तब्बल 22 खेळाडूंच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे

एकामुळे तब्बल 22 खेळाडूंच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे

एकामुळे तब्बल 22 खेळाडूंच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे

इस्तानबुल, 12 नोव्हेंबर : जगभरात कोरोनाचा प्रसार होत असताना क्रीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्रोएशियाचा कॅप्टन (Croatia captain Domagoj Vida) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Possitve) असताना तुर्कस्तानच्या (Turkey Team) संघासोबत पहिल्या हाफपर्यंत सामना खेळत होता अशी माहिती समोर आली आहे. क्रोएशियाचा कर्णधार डोमागोज विदा बुधवारी रात्री तुर्कस्तानविरुद्ध फूटबॉलचा मैत्रीपूर्ण सामना खेळत होता. डोमागोज विदा हा कोरोना पॉझिटिव्ह होता आणि त्यातही तो पहिल्या 45 मिनिटांचा सामना खेळल्याची बातमी समोर आली आहे. त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच त्याला टीमकडून आयसोलेट करण्यात आलं.

सोमवारी विदा आणि टीममधील इतर खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. पण Besiktas centre कडून बुधवारी सकाळी सामन्याचा पहिला हाफ संपल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. क्रोएशियाकडून सांगितलेल्या माहितीनुसार, क्रोएशिया राष्ट्रीय टीमच्या वैद्यकीय टीमने दोन हाफच्या मधील ब्रेकमध्ये एकाची कोरोना चाचणी संभाव्य पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले.

हे ही वाचा-भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाची चाल, कसोटी संघात 'या' युवा खेळाडूंना संधी

त्यावेळी प्रशिक्षक झ्लाटको डॅलिक यांनी यापूर्वीच विदाला बदलण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय संघाच्या वैद्यकीय सेवेने चाचणी निकालाची पुष्टी होईपर्यंत सर्व साथीच्या उपाययोजनांनुसार विदाला आयसोलेट केलं. त्यामुळे पुढील काही दिवस विदा इस्टानबुलमध्ये आयोलेस होईल. "नकारात्मक चाचणी आलेले इतर सर्व राष्ट्रीय संघाचे सदस्य आणि कर्मचारी सदस्य स्टॉकहोमचा प्रवास नियोजित प्लानिंगनुसार असेल. यूईएफएच्या प्ले टू प्ले प्रोटोकॉलच्या अनुषंगाने राष्ट्रीय संघाने सर्व साथीच्या उपायांचे पालन केले आहे याकडे लक्ष दिले जाते. शनिवारी स्वीडनबरोबरच्या यूईएफए नेशन्स लीगच्या सामन्याआधी विदाची पुन्हा चाचणी केली जाईल. सध्या विदा पुढील काही  दिवसांसाठी आयसोलेट आहे.

First published: