नवी दिल्ली, 29 डिसेंबर : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी पुनरागमन करणार की निवृत्तीचा निर्णय घेणार याबाबत गेल्या सहा महिन्यापासून काहीही स्पष्ट झालेलं नाही. एकीकडे निवड समितीने ऋषभ पंतला जास्त संधी दिली जाईल आणि आता पुढचा विचार केला पाहिजे असं म्हटलं होतं. दरम्यान, धोनीनेसुद्धा यावर जानेवारीमध्ये बोलू असं उत्तर दिलं होतं. आता बीसीसीआय़ अध्यक्ष सौरव गांगुलीने धोनीने त्याच्या भविष्याबद्दल नक्कीच काहीतरी विचार केला असेल असं म्हटलं आहे.
गांगुली म्हणाला की, धोनीने कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केली आहे. पूर्ण विश्वास आहे की त्यानं पुढच्या वाटचालीबाबत निवड समितीशी बोलणं केलं असेल. यापेक्षा अधिक बोलण्यास मात्र गांगुलीने नकार दिला.
धोनीचं कौतुक करताना गांगुली म्हणाला की, धोनीसारखा खेळाडू मिळणं कठीण आहे. पुढे काय करायचं हा त्याचा निर्णय आहे. गांगुलीने हे स्पष्ट केलं आहे की, क्रिकेटबाबत धोनीशी कोणतीही चर्चा झालेली नाही. धोनी चॅम्पियन आहे आणि त्याच्यासारखा खेळाडू लवकर मिळणार नाही. खेळायचं की नाही हे धोनीला ठरवायचं आहे असंही गांगुलीने सांगितलं.
विस्डननं निवडला IPLचा बेस्ट संघ, धोनी-विराट नाही तर ‘या’ खेळाडूला दिले कर्णधारपद
भारतीय संघांच्या कामगिरीबद्दल बोलताना गांगुलीने सांगितलं की, पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्डकपचा भारत प्रबळ दावेदार आहे. भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो. भारतीय संघाने सलग कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताला आय़सीसीच्या स्पर्धेत मात्र अपयश आलं आहे.
भारताने याआधी 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर संघाला आयसीसीच्या एकाही स्पर्धेत विजेतेपद मिळवता आलेलं नाही. याबाबत कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचं गांगुलीने म्हटलं.
'हॅलो देवी प्रसाद?' केएल राहुलनं शेअर केला आथिया शेट्टीसोबतचा फोटो
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, MS Dhoni, Sourav ganguly