मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेटपटू एवढा तापला की डोक्यातून धूर निघाला? VIDEO VIRAL

क्रिकेटपटू एवढा तापला की डोक्यातून धूर निघाला? VIDEO VIRAL

क्रिकेटच्या मैदानावर खेळत असलेल्या खेळाडूच्या डोक्यातून धूर निघत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

क्रिकेटच्या मैदानावर खेळत असलेल्या खेळाडूच्या डोक्यातून धूर निघत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

क्रिकेटच्या मैदानावर खेळत असलेल्या खेळाडूच्या डोक्यातून धूर निघत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    लाहोर, 29 फेब्रुवारी : क्रिकेटच्या मैदानावरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात फलंदाजाने केलेली फटकेबाजी, गोलंदाजाने घेतलेली विकेट किंवा इतर काही घटनांचा समावेश असतो. आता ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ख्रिस लिनचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. यामध्ये लिनच्या डोक्यातून धुर आल्यासारखं दिसत आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील हा व्हिडिओ आहे. पीएसएलमध्ये ख्रिस लिन लाहोर कलंदर्सकडून खेळत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रावळपिंडीत पीएसएलच्या 11 व्या सामन्यात पेशावर जाल्मी आणि लाहोर कलंदर्स आमने-सामने आले. पावसाचा व्यत्यय आल्याने सामना कमी षटकांचा खेळवण्यात आला. 12 षटकांच्या सामन्यात पेशावरने 7 बाद 132 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना लाहोरच्या संघाला 6 बाद 116 धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना पेशावरने 16 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लिनने 15 चेंडूत तुफान फटकेबाजी करत 4 चौकार आणि 1 षटकारासह 30 धावा केल्या. त्याच्याशिवाय समित पटेल यानंही फटकेबाजी केली. पटेलनं 15 चेंडूत 34 धावा केल्या. याच सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना लिनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्याच्या डोक्यातून धूर निघत असल्यासारखं दिसतं. पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा आणि त्यात खेळताना शरीराचे तापमान वाढल्यानं वाफा निघाल्या असतील असंही म्हटलं जात आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट आल्या आहेत. वाचा : Zomato च्या डिलिव्हरी बॉयने जिंकलं सगळ्यांचं मन, VIDEO तुफान VIRAL
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या