मुंबई, 13 जानेवारी : स्मृती मानधना ही जगातील सर्वोत्कृष्ट महिला फलंदाजांपैकी एक आहे. अवघ्या 26 वर्षाच्या स्मृतीला आयसीसीच्या क्रिकेटर ऑफ दि इयर हा पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले आहे. 2023 मध्ये स्मृतीला क्रिकेट विश्वात 10 वर्ष पूर्ण होतील. अशातच तिने तिच्या क्रिकेट विषयी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगताना मोठा खुलासा केला आहे. स्मृती मानधना ही क्रिकेट विश्वात खूप प्रसिद्ध असल्याने तिचे अनेक चाहते आहेत. स्मृती माधानाने एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना तिच्या प्रेमाबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “बॅटिंगवर माझे प्रेम आहे. मी त्याच्यासाठी रात्री २ वाजता देखील उठू शकते”. त्याऐवजी तिला तिची झोप देखील प्रिय असल्याचे तिने सांगितले. तसेच मी कुठे ही कोणत्याही ठिकाणी निवांत झोपू शकते असे तिने सांगितले. हे ही वाचा : Under 19 WC : महिलांचा टी20 वर्ल्ड कप उद्यापासून, भारताची मॅच कधी? जाणून घ्या मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात स्मृती मानधनाने वनडे मध्ये 3 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तसेच तीने मिताली राज आणि हरमनप्रीत कौर सह विशेष क्लब मध्ये आपली जागा बनवली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3 हजार धावा करण्याच्या बाबतीत तो एकूण तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 76 डावात ही कामगिरी केली. त्यांच्या पुढे फक्त ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क आणि मेग लॅनिंग आहेत. भारतीय पुरुष क्रिकेटपटूंबद्दल बोलायचे झाले तर मंधाना या बाबतीत विराट कोहली आणि शिखर धवनच्या मागे आहे. यावरून त्याच्या आक्रमक फलंदाजीचा अंदाज बांधता येतो. हे ही वाचा : IPL : पंजाब किंग्सच्या खेळाडूने हिंदू कुटुंबाचे केले मुस्लिम धर्मांतर? पाक कर्णधाराच्या वक्तव्याने खळबळ स्मृती मानधना म्हणाली की, कधीकधी माझी आई विचारते, तू 10 वर्षे क्रिकेट खेळला आहेस, मग तुला आणखी काही करायचे आहे का. मात्र याबाबत मी काहीही ठरवले नाही. मी आता टेनिस खेळायला सुरुवात केली तरी पुन्हा क्रिकेटमध्ये येईन. स्मृतीचा भाऊ देखील यापूर्वी महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.