जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ...तर कदाचीत सचिन मिळाला नसता, दिग्गजांशी तुलनेवर शुभमन गिलने दिली प्रतिक्रिया

...तर कदाचीत सचिन मिळाला नसता, दिग्गजांशी तुलनेवर शुभमन गिलने दिली प्रतिक्रिया

सचिन, विराटशी तुलनेवर शुभमन गिलची प्रतिक्रिया

सचिन, विराटशी तुलनेवर शुभमन गिलची प्रतिक्रिया

सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांकडून तरुण खेळाडूंना जितकी प्रेरणा दिलीय ती खूप मोठी असल्याचं शुभमनने म्हटलंय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : शुभमन गिलसाठी यंदाचं वर्ष आतापर्यंत जबरदस्त असं राहिलं आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात त्याने चमकदार कामगिरी केलीय. आयपीएलमध्ये तर त्याने धमाकाच केला आहे. यंदाच्या हंगामात त्याने आतापर्यंत 3 शतके केली आहे. विराट कोहली असा भारतीय फलंदाज आहे ज्याने आयपीएलच्या एका हंगामात 4 शतके केली आहेत. शुभमन गिल चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये विराट कोहलीच्या कामगिरीशी बरोबरी करू शकतो. शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याची कामगिरी केलीय. तसंच टी20 मध्येही पहिलं शतक केलं आहे. क्रिकेटमध्ये त्याच्या या कामगिरीनंतर विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर या दिग्गजांशी त्याची तुलना केली जात आहे. भारतीय क्रिकेटमधला नवा स्टार असंही त्याला मानलं जात आहे. शुभमन गिलने या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना मन जिंकलं आहे. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांकडून तरुण खेळाडूंना जितकी प्रेरणा दिलीय ती खूप मोठी असल्याचं शुभमनने म्हटलंय. धोनी, पाऊस अन् राखीव दिवस; धोनीच्या अन् CSKच्या चाहत्यांसाठी हा योगायोग वाईट   शुभमन गिलने म्हटलं की, सचिन सर, विराट भाई, रोहित शर्मा यांनी ज्या पद्धतीने तरुणांना प्रेरणा दिलीय ते शब्दात सांगता येणार नाही. आपण 1983 ला वर्ल्ड कप जिंकला नसता तर जगाला सचिन तेंडुलकर मिळाला असता का? कदाचित नाही. जर आपण 2011 चा वर्ल्ड कप जिंकला नसता तर मला तितकीच प्रेरणा मिळाली असती का? कदाचित हो किंवा नाही. सांगू शकत नाही. अशा पद्धतीने वारसा नेहमीच अमर राहील. सचिन तेंडुलकरनेही शुभमन गिलच्या क्वालिफायर दोनमधील शतकाचं कौतुक केलं होतं. त्याने म्हटलं होतं की, शुभमन गिलचं शतक हे अविस्मरणीय असं होतं. एका शतकामुळे मुंबई इंडियन्सच्या आशा उंचावल्या तर दुसऱ्या शतकाने मुंबईला फायनलमध्ये जाण्यापासून रोखलं. हेच क्रिकेटचं बदलणारं रुप आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात