मुंबई, 29 मे : आयपीएल 2023चा अंतिम सामना नियोजित वेळेनुसार 28 मे रोजी सायंकाळी साडे सात वाजता होणार होता. पण पावसाने व्यत्यय आणल्याने रविवारी सामना होऊ शकला नाही. शेवटी राखीव दिवशी सोमवारी 29 मे रोजी सामना होत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींसह धोनीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. चार वर्षांनी पुन्हा एक आगळावेगळा योगायोग घडताना दिसतोय. धोनीच्या आय़पीएलमधून निवृत्तीची चर्चा सुरू आहे. त्याचं हे शेवटचं आयपीएल असेल की नाहीय याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. पण पाऊस, राखीव दिवस यांचं कनेक्शन आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना त्याचा हा शेवटचा सामना असेल अशी भीतीही वाटत आहे. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईने दहाव्यांदा फायनलमध्ये धडक मारलीय. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तीन वर्षांपूर्वी निवृत्ती घेतलीय. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनल धोनीने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. न्यूझीलंडविरुद्ध भारताला सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. तेव्हाही पावसाने व्यत्यय सामन्यात व्यत्यय आला होता. त्यानंतर सेमीफायनल राखीव दिवशी खेळवण्यात आली होती. या सामन्यात धोनी अर्धशतक करून बाद झाला होता. धोनी बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या होत्या. धोनी तेव्हा त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात होता. निवृत्तीचा विचार त्याने केला नव्हता मात्र वर्ल्ड कपनंतर कोरोनाने क्रिकेटसह सर्वच खेळावर परिमाण झाला. त्याचवेळी धोनीने 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. रायुडूनंतर धोनीसह हे दिग्गज निवृत्तीच्या वाटेवर, 100 कसोटी खेळलेल्या क्रिकेटपटूचा समावेश पुन्हा तोच योगायोग आताही अशीच काहीशी स्थिती आहे. धोनी आयपीएलमध्ये त्याच्या अखेरच्या टप्प्यात असल्याच्या चर्चा यंदाचा हंगाम सुरू होण्याआधीपासूनच रंगल्या आहेत. तो कधीही निवृत्ती जाहीर करू शकतो असं म्हटलं जातंय. त्यातच आता अंतिम सामन्यात पाऊस पडल्यानं आणि सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार असल्याचा योगायोग आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच आय़पीएलमध्येही धोनीचं करिअर इथेच संपणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. अखेरच्या सामन्याचे रेकॉर्ड वाईट टी20 क्रिकेट असो किंवा एकदिवसीय आणि कसोटी सामना, धोनीला त्याच्या कारकिर्दीत हे अखेरचे सामने जिंकता आलेले नाहीत. धोनीने त्याची अखेरची कसोटी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. तो सामना ड्रॉ राहिल्यानंतर धोनीने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. अखेरचा टी20 सामनाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. त्यात भारताचा 7 विकेटने पराभव झाला. तर अखेरचा एकदिवसीय सामना 2019 च्या वनडे वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये खेळला होता. त्यातही न्यूझीलंडकडून भारताला पराभवाचा धक्का बसला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.