नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: क्रिकेट (Cricket )आणि बॉलिवूड (bollywood) यांचे प्रेमाचे नाते सर्वश्रुत आहे. अनेक क्रिकेट स्टार्सनी बॉलिवूडमधील पऱ्यांशी लग्नगाठ बाधून संसार थाटला आहे. पण यासर्वाला आयपीएलमधील कोलकाता संघाचा आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल(Shubman Gill) अपवाद ठरतोय असे म्हणायला हरकत नाही. कारण त्याने आपल्या चाहत्यांना प्रेमात पडू नका असा खास सल्ली दिला आहे. त्यामुळे फॅन्सनी त्याच्या या सल्ल्याला प्रतिसाद देत तुझा ब्रेकअप झालाय का? असा सवाल उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शुभमन गिल(Shubman Gill) आणि सारा तेंडुलकरचं (sara tendulkar) नाव जोडलं जात आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चादेखीर रंगली आहे. अशातच, शुभमनने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याने ब्लॅक रंगाचा टी-शर्टवर घातला असून त्यावर लिहिले आहे - ‘परीच्या प्रेमात पडू नकोस.’ तसेच त्याने कॅप्शमध्ये ’ Sigma rule no.1’ असे म्हटले आहे.
त्याचा हा सल्ला पाहून चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एक युझरने तर चक्क शुभमन गिलला त्याचं ब्रेकअप झालं का? असा थेट प्रश्न विचारला आहे. शुभमन गिलने यावर दिलेलं उत्तर तर त्या पेक्षाही भन्नाट आहे. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहेत. मात्र यासंदर्भात कोणीच अधिकृत बोललं नाही. आता युझरने विचारलेल्या प्रश्नानंतर मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला असं म्हणायला हरकत नाही. शुभमनने चाहत्यांना उत्तर देताना म्हटलं आहे की, अरे हा, मी सध्या सिंगल आहे. याचा मी सध्या विचार करत नाही आणि भविष्यात करेन असं वाटत नाही. आताही याबाबत योजना नाही. असे म्हटले आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात शुभमन आणि साराच्या एकसारख्या कॅप्शनने त्यांच्यातल्या नात्याच्या अफवांना हवा दिली होती. दोघांनी त्यावेळी एकसारखीच कॅप्शन देऊन आपापले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.