मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

श्रेयस अय्यरची जबरा फॅन, भेटण्यासाठी 2 तास एयरपोर्टवर उभी राहिली महिला, VIDEO

श्रेयस अय्यरची जबरा फॅन, भेटण्यासाठी 2 तास एयरपोर्टवर उभी राहिली महिला, VIDEO

भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) चाहते जगभरात आहेत, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. त्रिनिदाद ऍण्ड टोबॅगोच्या पोर्ट ऑफ स्पेन विमानतळावर भर पावसात श्रेयस अय्यरला भेटण्यासाठी महिला फॅन 2 तास थांबली होती.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 21 जुलै : भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) चाहते जगभरात आहेत, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. त्रिनिदाद ऍण्ड टोबॅगोच्या पोर्ट ऑफ स्पेन विमानतळावर भर पावसात श्रेयस अय्यरला भेटण्यासाठी महिला फॅन 2 तास थांबली होती. श्रेयस अय्यरच्या या फॅनचं नाव शिजारा असल्याचं सांगितलं जात आहे. मी श्रेयसची सगळ्यात मोठी फॅन असल्याचं शिजारा सांगते. तिने बॅटवर श्रेयस अय्यरची सहीदेखील घेतली. शिजारा रोहितचीही चाहती श्रेयस अय्यरची ही महिला चाहती रोहित शर्मा आणि केएल राहुलचीही फॅन आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुलची ऑटोग्राफ घेण्यासाठी आपण ब्रायन लारा स्टेडियममध्ये जाणार असल्याचं शिजाराने सांगितलं. मला भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांना भेटायचं होतं, पण आता विराट आणि बुमराह वगळता आपण सगळ्यांना भेटलो असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. विराटला आराम भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली 3 वनडे मॅचची सीरिज 22 जुलैपासून सुरू होणार आहे. पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्कमध्ये हे सामने खेळवले जातील. या सीरिजसाठी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना आराम देण्यात आला आहे. वनडे सीरिजचं नेतृत्व शिखर धवन करणार आहे. वनडे सीरिजनंतर 29 जुलैपासून 5 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे.
First published:

Tags: Shreyas iyer, Team india

पुढील बातम्या