• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ENG vs PAK : पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर नाराज, म्हणाला...

ENG vs PAK : पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर नाराज, म्हणाला...

इंग्लंडच्या 'बी' टीमनं गुरुवारी झालेल्या वन-डे मध्ये पाकिस्तानचा (ENG vs PAK) पराभव करत वन-डे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्ताननं दिलेलं 142 रनचं आव्हान इंग्लंडनं फक्त 1 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

 • Share this:
  मुंबई, 9 जुलै : इंग्लंडच्या 'बी' टीमनं गुरुवारी झालेल्या वन-डे मध्ये पाकिस्तानचा (ENG vs PAK) पराभव करत वन-डे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्ताननं दिलेलं 142 रनचं आव्हान इंग्लंडनं फक्त 1 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पाकिस्तानच्या लाजीरवाण्या कामगिरीवर माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) नाराज झाला आहे. अख्तरनं पाकिस्तानी न्यूज चॅनलवरील कार्यक्रमात सांगितले की, 'पिच काही खास नव्हते. साकिब महमूदनं खूप चांगली बॉलिंग केली. पाकिस्तानच्या टीममध्ये पूर्वीसारखे गुणवत्ता आणि खेळाडू राहिले नाहीत. कॅप्टन बाबर आझम चांगला खेळाडू आहे. पण, त्याला लवकरच फिनिशरची भूमिका पार पाडावी लागेल. बाबर आणि फखर सेट झाले नाहीत तर पाकिस्तानची टीम 150 रन देखील करु शकत नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चुकीच्या धोरणामुळे ही अवस्था झाली आहे. पैसे खर्च करुन क्रिकेट पाहावं असा एकही खेळाडू पाकिस्तानच्या टीममध्ये नाही. आता पाकिस्तानची मॅच पाहणे बंद केले पाहिजे.' इंग्लंडचा दणदणीत विजय इंग्लंडच्या एवढ्या नवख्या टीमसमोर पाकिस्तानची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. मॅचच्या पहिल्याच बॉलला इमाम उल हक (Imam Ul Haq) शून्य रनवर बाद झाला, तर कर्णधार बाबर आझमही (Babar Azam) 2 बॉलमध्ये शून्य रन करून माघारी परतला. पाकिस्तानकडून ओपनर फखर झमानने (Fakhar Zaman) सर्वाधिक 47 रन केले, तर शादाब खान 30 रनवर आऊट झाला. Tokyo Olympics: भारताचे ऑलिम्पिकमध्ये तगडे आव्हान, 8 जण आहेत गोल्ड मेडलचे दावेदार पाकिस्ताननं दिलेलं 142 रनचं आव्हान इंग्लंडनं 21.5 ओव्हर्समध्येच पूर्ण केले. इंग्लंडकडून डेव्हिड मलाननं (Dawid Malan) नाबाद 68 तर झॅक क्राऊलीनं (Zak Crawley) नाबाद 58 रन काढले. पाकिस्तानविरुद्धची सीरिज सुरु होण्याच्या तीन दिवस आधीच इंग्लंड टीममधल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाली, यातले 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफचे सदस्य होते, त्यामुळे इंग्लंडला अखेरच्या क्षणी संपूर्ण टीमच बदलावी लागली. 18 जणांच्या या टीममधल्या 9 खेळाडूंची पहिल्यांदाच इंग्लंडच्या टीममध्ये निवड झाली.
  Published by:News18 Desk
  First published: