मुंबई, 9 जुलै : टोक्यो ऑलिम्पिकला (Tokyo Olympics) 23 जुलैपासून सुरुवात होणार आहे. कोरोना व्हायरसचा धोका या संपूर्ण स्पर्धेवर आहे. त्यामुळे टोक्यो शहरात आणिबाणी लागू करण्याची घोषणा जपान सरकारने केली आहे. असं असलं तरी खेळाच्या मैदानात थरारक लढती आणि नव्या विक्रमांची नोंद होईल. भारताची आजवरची सर्वात बलाढ्य टीम या ऑलिम्पिकमध्ये उतरणार असून यंदा तब्बल 8 जण गोल्ड मेडलचे दावेदार आहेत. (Instagram/Bajrang Punia)
तिरंदाज दीपिका कुमार (Deepika Kumari) गेल्या 10 वर्षांपासून भारतीय तिरंदाजीचा चेहरा आहे. दीपिकानं 2010 साली दिल्लीमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन गोल्ड मेडल जिंकले होते. दीपिकाला लंडन (2012) आणि रियो ऑलिम्पिक (2016) स्पर्धेचा अनुभव आहे. यंदा फॉर्मात असलेल्या दीपिकाकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. (Deepika Kumari/Instagram)
भारताची युवा नेमबाज इलावोनिल वलारीन (Elavenil Valarivan) देखील गोल्ड मेडलची दावेदार आहे. 21 वर्षांच्या इलावोनिलनं यापूर्वी अनेक पदकांची कमाई केली आहे. ती टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांच्या टीमलाही गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता आहे. (Twitter/Elavenil Valarivan)