VIDEO : 'रोहित नावापुढे G लाव', अख्तरने का दिला होता असा सल्ला?

VIDEO : 'रोहित नावापुढे G लाव', अख्तरने का दिला होता असा सल्ला?

भारताचा हिटमॅन रोहित शर्माला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं नावापुढे G लावण्याचा सल्ला दिला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही डावात शतक केल्यानंतर त्यानं रोहितचं कौतुक केलं आहे.

  • Share this:

विशाखापट्टणम, 06 ऑक्टोबर : भारताचा हिटमॅन रोहित शर्मा टी20 आणि एकदिवसीय पाठोपाठ आता कसोटीतही धमाका करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात त्यानं शतकं झळकावली. पहिल्या डावात त्यानं दीडशतक करताना मयंक अग्रवालसोबत विक्रमी 317 धावांची भागिदारी केली.

रोहित शर्माच्या खेळीनंतर पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने कौतुक केलं आहे. रोहितमध्ये असलेल्या क्षमतेची जाणीव 2013 मध्येच झाली होती. अख्तरने म्हटलं की, बांगलादेशमध्ये रोहितला म्हटलं होतं की नावाच्या पुढे G लाव आणि ग्रेट रोहित शर्मा करून घेत. कारण भारतातला कोणताही फलंदाज तुझ्यापेक्षा मोठा नाही.

अख्तरने रोहितला सल्लाही दिला होता की, रोहितने आत्मविश्वास वाढवावा. त्यासाठी त्याला थोडा वेळ लागेल. वनडेमध्ये त्यानं स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्याच्याकडं फटक्यांची अचूक निवड आहे आणि टायमिंगसुद्धा चांगलं आहे.

पहिल्याच सामन्यात सलामीवीर म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. याचबरोबर रोहितनं दाखवून दिले की तो फक्त टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाही तर कसोटीमध्येही आपली कमाल दाखवून दिली. रोहित शर्मानं दोन्ही डावांमध्ये चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात 176 तर दुसऱ्या डावात 127 धावा केल्या.

परीक्षा नंतरही देता येईल, पण झाडं तुटली तर..,'आरे'साठी कारे करणारी रणरागिणी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 09:02 AM IST

ताज्या बातम्या