तत्पूर्वी, न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. विराट कोहलीच्या अनुपस्थित खेळणाऱ्या भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. सलामीला खेळणाऱ्या रोहित शर्माने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने संजू सॅमसनला सलामीला खेळवलं. मात्र तो फक्त दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. लोकेश राहुलसोबत त्याने डाव सावरला. लोकेश राहुल 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतक साजरं केलं. पण 60 धावांवर त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. त्यानंतर श्रेयस अय्यरने अखेरच्या षटकात फटकेबाजी केल्यानं संघाच्या 20 षटकांत 3 बाद 163 धावा झाल्या. श्रेयस अय्यर 33 धावांवर तर मनिष पांडे 11 धावांवर नाबाद राहिले. रोहित शर्माने अर्धशतक साजरं करताना विराटला मागे टाकलं आहे. रोहितचं टी20 मधील हे 25 वे अर्धशतक असून विराट कोहली 24 अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुप्टिलने 17 अर्धशतके केली आहे. भारताने या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा टी 20 सामना सुरू आहे. पहिले चार सामने जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यात विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची संधी भारताला आहे. 'विराटने पंतसोबत तसं करू नये', सेहवागचा धोनीवर गंभीर आरोपNew Zealand in the last two overs
— ICC (@ICC) February 2, 2020
6, 6, 4, 1, 4nb, 6, 6, 1, 0, 1, 6, 1, 0#NZvIND pic.twitter.com/V5HYmGC7E4
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket