मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Final बघतानाच भारताच्या माजी कॅप्टनला आला Heart Attack, रुग्णालयात नेतानाच मृत्यू

IPL Final बघतानाच भारताच्या माजी कॅप्टनला आला Heart Attack, रुग्णालयात नेतानाच मृत्यू

भारताच्या अंडर-19 टीमचा माजी कर्णधार आणि सौराष्ट्रचा विकेट कीपर बॅटर अवी बारोट (Avi Barot Death) याचं शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. अवी शुक्रवारी रात्री अहमदाबादमध्ये आपल्या घरात बसून चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यातली आयपीएल फायनल मॅच (IPL 2021 Final) बघत होता

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 ऑक्टोबर : भारताच्या अंडर-19 टीमचा माजी कर्णधार आणि सौराष्ट्रचा विकेट कीपर बॅटर अवी बारोट (Avi Barot Death) याचं शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. अवी शुक्रवारी रात्री अहमदाबादमध्ये आपल्या घरात बसून चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यातली आयपीएल फायनल मॅच (IPL 2021 Final) बघत होता, याचवेळी त्याला हृदयविकाराचा धक्का आला. रुग्णालयात नेईपर्यंत अवीचं निधन झालं होतं. 5 दिवसांपूर्वीच त्याने 43 बॉलमध्ये 72 रनची खेळी करून सौराष्ट्रला रिलायन्स जी-1 टी-20 स्पर्धा जिंकवली होती. अवीच्या कुटुंबात त्याची आई आणि पत्नी आहेत. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने एक प्रसिद्धी पत्रक काढून 29 वर्षांच्या अवी बारोटच्या निधनाची माहिती दिली होती. 'आम्ही सगळे सौराष्ट्रचा शानदार क्रिकेटपटू अवी बारोटच्या अकाली निधनामुळे दु:खी आहोत,' असं सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सांगितलं. अवी 2019-20 च्या रणजी ट्रॉफी विजेत्या सौराष्ट्र टीममध्येही होता. राजकोटमध्ये झालेल्या त्या सामन्यात सौराष्ट्रने बंगालचा पराभव केला होता. याचवर्षी बारोटने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत 53 बॉलमध्ये 122 रनची खेळी केली होती, यामध्ये 11 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. या धमाकेदार शतकामुळे अवी बारोट चर्चेत आला होता. अहमदाबादचा रहिवासी असलेल्या अवी बारोटने 2011 साली गुजरातकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. याचवर्षी तो भारताच्या अंडर-19 टीमचा कर्णधारही झाला होता. गुजरातनंतर तो हरियाणाकडून खेळण्यासाठी गेला, पण नंतर त्याने पुन्हा गुजरातच्या टीममध्ये पुनरागमन केलं. 2016-17 साली अवी सौराष्ट्रच्या रणजी टीममध्ये आला. सौराष्ट्रकडून तो विकेट कीपर आणि ओपनिंग बॅटर म्हणून खेळत होता. बारोटने 38 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एक शतक आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने 1,547 रन केल्या. 38 लिस्ट ए मॅचममध्ये त्याने 8 अर्धशतक करत 1030 रन केले. स्थानक टी-20 मध्ये त्याने एक शतक आणि 5 अर्धशतकं करत 717 रन केले होते. टी-20 मध्ये त्याचा स्ट्राईक रेट 38 चा हता. अवी बरोट ऑफ स्पिन बॉलिंगही करायचा. तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून त्याने 11 विकेटही घेतल्या होत्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या