जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सौदी अरेबिया मेहरबान, रोनाल्डो अन् त्याच्या गर्लफ्रेंडचा तो गंभीर गुन्हा माफ

सौदी अरेबिया मेहरबान, रोनाल्डो अन् त्याच्या गर्लफ्रेंडचा तो गंभीर गुन्हा माफ

सौदी अरेबिया मेहरबान, रोनाल्डो अन् त्याच्या गर्लफ्रेंडचा तो गंभीर गुन्हा माफ

रोनाल्डोला सौदी अरेबियाच्या अल नस्र क्लबने मोठी रक्कम मोजून करारबद्ध केलं आहे. क्लबकडून त्याने पदार्पणाचा सामनाही खेळला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 जानेवारी : फिफा वर्ल्ड कप २०२२ चे आयोजन कतारमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत त्यांच्या क्रूर नियमांची चर्चा झाली होती. कपडे घालण्यापासून ते सेक्सपर्यंत अनेक बंधने लादण्यात आली होती. याचे पालन परदेशी खेळाडू, चाहते आणि पर्यटकांसाठी एक मोठा टास्कच होता. तशीच काहीशी परिस्थिती सौदी अरेबियात आहे. कठोर नियम आणि कायदे असणाऱ्या सौदी अरेबियाने आता स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे. दरम्यान, सौदी अरेबियात जी गोष्ट गंभीर गुन्हा मानली जाते ती केल्यानंतरही रोनाल्डो अन् त्याच्या गर्लफ्रेंडला माफ करण्यात आलं आहे. रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड यांनी लग्न केलेलं नाही. मात्र तरीही सौदी अरेबियात ते एकत्र राहतील. सौदी अरेबियाच्या नियमाविरुद्ध ते एकत्र राहणार आहेत. रोनाल्डोला सौदी अरेबियाच्या अल नस्र क्लबने मोठी रक्कम मोजून करारबद्ध केलं आहे. क्लबकडून त्याने पदार्पण केलं आहे. Al Tai FC विरुद्ध त्यानं पदार्पण केलं पण सामन्यात रोनाल्डोला गोल करता आला नाही. हेही वाचा :  VIDEO : रोनाल्डोला गर्लफ्रेंडने दिली कोट्यवधींची आलिशान कार, सरप्राइज पाहताच झाला अवाक् रोनाल्डो त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिनासोबत सौदी अरेबियात पोहोचला होता. त्यांच्यासोबत मुलंही होती. जॉर्जिना आणि रोनाल्डो यांना दोन मुलं आहेत. लग्नाशिवाय मुलं होणं हे इस्लामिक देश असलेल्या सौदीमध्ये गंभीर गुन्हा आहे. इतकंच नाही तर लग्नाशिवाय एकत्र राहणं, रूम शेअर करणं हेसुद्धा सौदीत गुन्हा मानला जातो. मात्र सौदी अरेबियाने आपल्या पाहुण्यांसाठी या नियमात तडजोड केली आहे. त्यामुळे रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एकत्र राहू शकतील.

News18लोकमत
News18लोकमत

सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितलं की, या जोडीवर कोणतीही कारवाई होणार नाही. पण हा नियम देशातील प्रत्येकावर आधीप्रमाणेच लागू राहील. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: football
  • First Published :
जाहिरात
जाहिरात