जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 10 चेंडूत 35 धावा करणाऱ्या मुंबईकर खेळाडूला विराटने काढलं होतं बाहेर, आता केलं त्रिशतक

10 चेंडूत 35 धावा करणाऱ्या मुंबईकर खेळाडूला विराटने काढलं होतं बाहेर, आता केलं त्रिशतक

10 चेंडूत 35 धावा करणाऱ्या मुंबईकर खेळाडूला विराटने काढलं होतं बाहेर, आता केलं त्रिशतक

विराट कोहलीने 2016 च्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा खेळाडू सर्फराज खानने 10 चेंडूत 35 धावा केल्यानंतरही संघातून बाहेर ठेवलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली टीम इंडिया असो किंवा आयपीएलमध्ये आरसीबी असो युवा खेळाडूंवर विश्वास ठेवतो. पण तो कोणत्याही बाबतीत फिटनेसमध्ये तडजोड करत नाही. यामुळेच त्याने विराट कोहलीने 2016 च्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा खेळाडू सर्फराज खानने 10 चेंडूत 35 धावा केल्यानंतरही संघातून बाहेर ठेवलं होतं. आता सर्फराजने रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळताना त्रिशतक साजरं केलं आहे. सर्फराज खानने चार वर्षांपूर्वी मुंबईची साथ सोडून उत्तर प्रदेशकडून खेळण्यास सुरुवात केली होती. उत्तर प्रदेशाकडून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळेल अशी आशा होती. मात्र त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी पुन्हा सर्फराज मुंबईच्या संघात परतला. यंदाच्या सत्रात त्याला रणजीत मुंबईने संधी दिली. बुधवारी त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध त्रिशतकी खेळी केली. मुंबईकडून खेळताना सर्फराजने 388 चेंडूत द्विशतक पूर्ण केलं. यात त्याने 33 चौकार आणि 8 षटकार मारले आहेत. सर्फराजशिवाय सिद्धेश लाडने 98 धावा केल्या. खराब फॉर्ममध्ये असलेल्या सिद्धेशसाठी ही खेळी महत्वाची ठरली. या दोघांनंतर भूपेन लालवानीने 43 आणि हार्दिक जितेंद्रने 51 धावा केल्या.

जाहिरात

उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 625 धावांवर डाव घोषित केला. यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज उपेंद्र यादवने 203 धावा केल्या. तर आकाश दीप नाथने 115 धावा केल्या. याशिवाय रिंकू सिंगने 84 धावा केल्या. मुंबईच्या रोयस्टनने सर्वाधिक तीन तर तुषार देशपांडेने 2 गडी बाद केले. BCCI ने घेतलाय धसका, साहाला शेवटच्या क्षणी रणजी खेळण्यास दिला नकार इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्फराजने एकूण 33 सामन्यांमध्ये 408 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. 2019 मध्ये आयपीएलच्या हंगामात त्याला 8 सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली होती. यात त्याने 180 धावा केल्या होत्या. गोलंदाजाच्या डोक्यावरून उडी मारणं पडलं महागात, मैदानावरून पोहोचला हॉस्पिटलमध्ये

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात