नवी दिल्ली, 22 जानेवारी : न्यूझीलंड दौऱ्याआधी भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. शिखर धवनपाठोपाठ इशांत शर्मालाही दुखापत झाली आहे. या दुखापतींचा बीसीसीआय़ने धसका घेतल्याचं दिसत आहे. बीसीसीआयने दुखापतीतून सावरणाऱ्या यष्टीरक्षक ऋद्धिमान साहाला रणजी ट्रॉफीत खेळण्यास परवानगी नाकारली आहे. न्यूझीलंड दौऱ्याआधी त्याला दुखापत होऊ नये यासाठी बीसीसीय़आने असा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात नोव्हेंबरमध्ये कोलकत्यात झालेल्या डे नाइट कसोटीवेळी साहाच्या बोटाला दुखापत झाली होती.
बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी सांगितंल की, दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी ऋद्धिमान साहा उपलब्ध नसेल. मला वाटतं बीसीसीआयने त्याला खेळण्यास परवानगी दिली नाही. तो संघात असता तर चांगलं असतं. त्याच्या अनुपस्थितीत फारसा फरक पडणार नाही.
सध्या साहा राष्ट्रीय क्रिकेक अकादमीत उपचार घेत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. रणजी ट्रॉफीत बंगालला साहाशिवाय आणखी दोन खेळाडूंची कमतरता भासणार आहे. त्यांचे अभिमन्यू इश्वरन आणि वेगवान गोलंदाज इशार पोरेल हे दोघेही खेळाडू भारत अ संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत.
वाचा : गोलंदाजाच्या डोक्यावरून उडी मारणं पडलं महागात, मैदानावरून पोहोचला हॉस्पिटलमध्ये
बीसीसीआयने याआधी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलासुद्धा रणजी ट्रॉफीत खेळण्यापासून रोखलं होतं. त्याची निवड केरळविरुद्धच्या सामन्यासाठी गुजरात संघात झाली होती. पण त्याला खेळण्याची परवानगी देण्यात आली नाही. बुमराहला विंडिज दौऱ्यावर असताना दुखापत झाली होती. यामुळे तो जवळपास 6 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता.
ऋद्धिमान साहा याआधी खांद्याच्या दुखापतीने त्रस्त होता. 2018 मध्ये तो बराच काळ संघातून बाहेर होता. त्याच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळाली होती. साहा त्यावेळी बेंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकादमीत उपचार घेत होता.
प्रतिस्पर्धी संघाचे 5 फलंदाज शून्यावर बाद, भारताने 29 चेंडूतच जिंकला सामना! मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.