मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

एक शेर तर दुसरा सव्वाशेर... सरफराज खानच्या भावाने ठोकले त्रिशतक

एक शेर तर दुसरा सव्वाशेर... सरफराज खानच्या भावाने ठोकले त्रिशतक

सरफराज खानचा 17 वर्षांचा भाऊ मुशीर खान याने नायडू ट्रॉफी मध्ये मुंबई संघाकडून खेळात असताना नाबाद त्रिशतक ठोकले. लंच ब्रेक पर्यंत मुशीर याने 358 चेंडूत 320 धावा केल्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Pawar

मुंबई, 23 जानेवारी : मुंबईचा फलंदाज सरफराज खान घरेलू क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. लागोपाठ शतके केल्यानंतरही त्याला टीम इंडियात संधी मिळत नसल्याने सध्या सरफराज चर्चेत आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला त्याचा लहान भाऊ मुशीर खान हासुद्धा फॉर्ममध्ये दिसत आहे. सीके नायडू ट्रॉफीमध्ये मुशीर खानने त्रिशतक झळकावलं आहे. संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात त्यानं महत्त्वाचं योगदान दिलंय.

सीके नायडू ट्रॉफीमध्ये मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात सरफराजचा लहान भाऊ मुशीरने त्रिशतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ८ बाद ७०४ धावांवर डाव घोषित केला. हैदराबादविरुद्धच्या लढतीत मुशीरने ३६७ चेंडू खेळताना ३३९ धावा केल्या. त्याचा स्ट्राइकरेट ९० पेक्षा जास्त होता. या खेळीत त्याने ३४ चौकार तर ९ षटकार मारले. मुशीरशिवाय या डावात मुंबईकडून अथर्व विनोदनेसुद्धा झंझावाती द्विशतक करत २०१४ धावा केल्या.

सरफराज खान आणि मुशीर खान हे मुंबईच्या संघाकडून खेळताना सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. सरफराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघाकडून धावा केल्या तर मुशीर सीके नायडू ट्रॉफीत धावांचा पाऊस पाडत आहे. टीम इंडियात सरफराजला संधी मिळावी असं चाहत्यांकडून म्हटलं जातंय.

हे  ही वाचा  : ईशान किशनला वॉर्निंग! पुन्हा चूक केल्यास वनडे सामन्यातून होणार निलंबन

मुशीरने याच हंगामात मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केलीय. त्याने तीन सामन्यात डावाची सुरुवातसुद्धा केली. सौराष्ट्र विरुद्ध पहिल्या सामन्यात मुशीरला १२ आणि २३ धावाच करता आल्या. तर आसामविरुद्ध ४२ धावांची खेळी केली होती. तीन सामन्यात त्याला फारशा धावा करता न आल्यानं ड्रॉप करण्यात आलं होतं. मात्र मुशीरने आता भरपाई करत त्रिशतक झळकावून पुन्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Ranji Trophy, Team india