जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Hello Goa, म्हणत सचिनची लाडकी लेक सारा गोव्यात करतेय मजा, PHOTO व्हायरल

Hello Goa, म्हणत सचिनची लाडकी लेक सारा गोव्यात करतेय मजा, PHOTO व्हायरल

Sara Tendulkar

Sara Tendulkar

मास्टार ब्लास्टर सचिन तेंडुलकरची(Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर(Sara Tendulkar) सध्या गोव्यात मजा करत आहेत. तेथील तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 डिसेंबर: मास्टार ब्लास्टर सचिन तेंडुलकरची(Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर(Sara Tendulkar) सध्या या ना त्या कारणाने चर्चेत असते. नुकतचं तिने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या साराने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने आपण गोव्यात(GOA) असल्याची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर साराचा चाहता वर्ग मोठ आहे. सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने हॅलो गोवा असे कॅप्शन लिहिले आहे. फोटोमध्ये साराने एका हातात फूल धरले आहे आणि ती हसताना दिसत आहे. त्याच्या या फोटोवर चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत.

जाहिरात

पार्श्वगायिका कनिका कपूर, हर्षदीप कौर आणि व्यावसायिक मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) फायटर आणि प्रशिक्षक अॅलन फर्नांडिस यांनीही साराच्या पोस्टवर कमेंट केली आहे. बॉलिवूडची बेबी डॉल फेम गायिका कनिका कपूरने साराला माझी मुलगी असल्याचे म्हटले आहे.

यापर्वीही तिने एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे. राच्या प्रत्येक फोटोवर लाखो लाइक्स आणि कमेंट्स येतात आणि या लेटेस्ट फोटोवरही असेच काहीसे पाहायला मिळाले. मात्र, दरवेळप्रमाणेच यावेळीही चाहत्यांनी साराचे नाव भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुबमन गिलसोबत जोडले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात