मुंबई, 23 डिसेंबर: भारताचा महान फलंदाज मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar ) लाडकी लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar ) नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती गोव्यामध्ये धमाल मस्ती करताना दिसत आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये ती हॉटेलच्या पायरीवर बसून फोनवर गप्पा मारताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना अनेक प्रश्न सतावू लागले आहेत. सारा तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गोव्यातील काही फोटो पोस्ट करताना दिसत आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ चर्चेत आला असून व्हिडीओमध्ये हॉटेल किंवा विलाच्या आसपासचा परिसर दिसतोय. त्यातच ज्यावेळी कॅमेरा फिरून साराकडे येतो त्यावेळी ती एका पायरीवर बसून कोणाशी तरी फोनवर गप्पा मारताना दिसत आहे. विशेष म्हणचे साराने जेव्हा कॅमेरा पाहिला तेव्हा हात हालवून अभिवादन करताना दिसत आहे.
#SaraTendulkar in #Goa pic.twitter.com/dNPJp6aZPZ
— Viraj B. (@VirajB1) December 23, 2021
तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. सारा नेमकं कुणाशी गप्पा मारत आहे. शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर इन्स्टाग्रामवर एकमेकाला फॉलो करतात. दोघेही एकमेकाच्या कुटुंबालाही फॉलो करतात. शुभमन गिल साराच्या कुटुंबातील सगळ्यांनाच फॉलो करतो, तर सारा शुभमनच्या बहिणींना फॉलो करते. त्यावरुन नेटीझन्सच्या मनात प्रश्न निर्माण झालेत. या कथित अफेअरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शुभमन गिलने काही दिवसांपूर्वी तो सिंगला असल्याचा दावा केला होता. शुभमन गिलने इन्स्टाग्रामवर प्रश्नोतराच्या चर्चांमध्ये सिंगल असल्याचे म्हटले होते. दोन दिवसांपूर्वी साराने हातामध्ये गुलाब घेत एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये गोवा असा उल्लेख केला होता. तिच्या या पोस्ट नंतर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्स वर्षाव केला. साराचा हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अनेक युझर्सनी मजेदार कमेंट केल्या आहेत. लोकांची तिची स्तुती करतानाच शुभमन गिलबद्दलही विचारले आहे. एका युजरने भाई, शुभमन गिल तू कुठे आहेस? असा प्रश्न विचारला आहे. सिंगर कनिका कपूरने ‘माय गर्ल’ म्हणून कमेंट केली आहे.