जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सारा तेंडुलकरच्या डाव्या हाताच्या बोटात दिसली अंगठी, Video पाहून Engagement च्या चर्चांना उधाण

सारा तेंडुलकरच्या डाव्या हाताच्या बोटात दिसली अंगठी, Video पाहून Engagement च्या चर्चांना उधाण

Sara Tendulkar

Sara Tendulkar

सारा तेंडूलकरने आपल्या सौंदर्याने बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.सारा नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. ज्यामुळे ती काय करते, कुठे जाते? हे सगळं तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचते. आता तर चक्क तिने एका व्हिडीओमधून तिचा साखरपुडा झाला असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 एप्रिल: माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याला सगळेच ओळखतात. त्यामुळे क्रिकेटच्या या देवाबद्दल तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु आता चर्चा होतेय ती सचिनची मुलगी सारा तेंडूलकरची(sara tendulkar). सारा तेंडूलकरने आपल्या सौंदर्याने बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.सारा नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. ज्यामुळे ती काय करते, कुठे जाते? हे सगळं तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचते. आता तर चक्क तिने एका व्हिडीओमधून तिचा साखरपुडा झाला असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या साराने मॉडलिंगमध्ये पदार्पण केलं आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केलं आहे. सध्या सारा आणि क्रिकेटर शुभमन गिल हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अनेकदा सारा शुभमन गिलसोबत दिसली देखील आहे. परंतु या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कधीही दुजोरा दिलेला नाही. परंतु त्यांच्या चाहत्यांना ही जोडी फार आवडते. सारा आणि शुभमनच्या नात्याच्या चर्चांदरम्यान साराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची चर्चा सुरु आहे. या पोस्टमध्ये साराने आपल्या डाव्या हाताच्या बोटात रिंग परिधान केली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर तिच्या एंगेजमेन्टच्या चर्चेला उधाण आले आहे. साराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती कोणत्या तरी गार्डनमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती लिपस्टीक, परफ्युम, लावाताना दिसत आहे तर डाव्या हाताच्या रिंग फिंगरमध्ये पहिल्यांदा एक रिंग परिधान करते आणि हाताची शोभा वाढवण्यासाठी इतर बोटांध्येही ती रिंग घालते.

जाहिरात

मात्र, रिंग फिंगरमध्ये तिने रिंग घातल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. तिने खरचं इंगेजमेंट केली का? केली असली तरी कोणासोबत केली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच तिने या व्हिडीओला दिवगंत अभिनेता सुशांत सिह राजपुतच्या राबता या चित्रपटातील ‘मिलती हैं जो अचानक सौगात हो’ या रोमँटिक गाण्याची जोड दिली आहे. दोन दिवसांपूर्वी, तिचे नाव बेबी एबीसोबत जोडण्यात आले. पराभवाच्या छायेत असलेल्या मुंबईच्या टीमला चीअर करण्यासाठी सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर स्टेडियममध्ये आली होती. सारा तेंडुलकर आणि तिची आई अंजली तेंडुलकर यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरलंही झाला होता. साराच्या स्टेडियममधील उपस्थितीनंतर तिचं नाव थेट बेबी एबीसोबत म्हणजेच डेवाल्ड ब्रेविसशी जोडण्यात आलं. यानंतर सोशल मीडियावर डेवाल्ड आणि सारा तेंडुलकरच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये, बेबी एबी सारा तेंडुलकरच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात