मुंबई, 15 नोव्हेंबर: भारतीय मुलींच्या मनात टेनिस खेळाबद्दल आवड आणि प्रेरणा निर्माण करण्याचं श्रेय सानिया मिर्झाला जातं. हैदराबाद येथील सानियानं, मुलीही तासन् तास टेनिस खेळू शकतात, याची जाणीव मुलींना करून दिली. महेश भूपती आणि लिएंडर पेस या पुरुष सहकाऱ्यांसह तिनं भारतीय टेनिसला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. भारताची ही टेनिससुंदरी आज (15 नोव्हेंबर) आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. मात्र, सानिया चर्चेत असण्याची किंवा वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वीही ती आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे चर्चेत राहिली आहे. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 1) पाकिस्तानी खेळाडूशी लग्न आणि घटस्फोटाच्या चर्चा सानिया मिर्झानं 2010 मध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केलं होतं. तिच्या या निर्णयाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. दोघांना इझान नावाचा मुलगा आहे. 30 ऑक्टोबरला त्याच्या वाढदिवसानिमित्त सानिया आणि शोएब एकत्र दिसले होते. त्यानंतर पुन्हा ते एकत्र दिसले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. सानियानं केलेल्या एका भावनिक पोस्टनंतर ती आणि शोएब एकमेकांपासून वेगळे होत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांनी अद्याप याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सारासोबत डेटिंगच्या चर्चांवर शुभमन गिले सोडलं मौन, म्हणाला..,. 2) कपड्यांमुळे निघाला होता फतवा टेनिस खेळताना सानिया शॉर्ट स्कर्ट घालत असे. ती मुस्लिम असल्याने तिला धार्मिक विरोधाचा सामना करावा लागला होता. मुस्लिम धर्मातील काही लोकांनी तिच्याविरोधात फतवा काढला होता. या शिवाय तिला तिच्या कपड्यांमुळे अनेक वाईट कमेंट्सचा सामना करावा लागला होता. मात्र, तिनं याचा आपला खेळावर परिणाम होऊ दिला नाही. 3) मशिदीत शूटिंग केल्यामुळे झाला होता वाद 2007 मध्ये अल्पसंख्याक कल्याण विभागाने सानिया विरुद्ध मशिदीच्या आवारात घुसून व्हिडिओ शूटिंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तिच्या चित्रीकरणामुळे स्थानिक नागरिक, मौलवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. Khel Ratn Award: चाळीसाव्या वर्षी झालं मेहनतीचं चीज! ‘या’ खेळाडूला क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार 4) राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप 2008 मध्ये, सानियानं राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप झाला होता. भारताचा राष्ट्रध्वज ठेवलेल्या टेबलच्या शेजारील टेबलावर पाय ठेवून सानिया टेनिस मॅच बघत असल्याचा फोटो समोर आला होता. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान प्रतिबंधक कायदा (1971) अंतर्गत तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याबद्दल तिला समन्स बजावण्यात आलं होतं. 5) साखरपुडा मोडला शोएब मलिकशी लग्न करण्यापूर्वी, 2009 मध्ये सानिया मिर्झानं बालपणीचा मित्र सोहराब मिर्झा सोबतचा साखरपुडा मोडला होता. साखरपुडा झाल्यानंतर सहा महिन्यांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. Breaking: शिष्याच्या कामगिरीनं उंचावली गुरुची मान, रोहितच्या प्रशिक्षकांना क्रीडा क्षेत्रातला ‘हा’ मानाचा पुरस्कार 6) टेनिस असोसिएशनशी वाद 2012 लंडन ऑलिंपिकपूर्वी सानिया मिर्झा आणि भारतीय टेनिस असोसिएशन (AITA) यांच्यात वाद झाला होता. सानियाला महेश भूपतीसोबत मिश्र दुहेरीत खेळण्याची इच्छा होती. मात्र, एआयटीएने तिला लिएंडर पेससोबत खेळण्यास सांगितलं होतं. सानियानं या निर्णयाला विरोध केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.