नवी दिल्ली, 16 जुलै : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध आंदोलनात सहभागी झालेली भारतीय महिला कुस्तीपट्टू संगीता फोगाटने परदेशात पदक जिंकलं आहे. संगीता फोगाटने हंगेरीत बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या वर्ल्ड रँकिंग सिरीज स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. संगीताने 59 किलो वजनी गटात तिने ही कामगिरी केली. संगीता त्या जणांपैकी होती ज्यांनी बृजभूषण शरण सिंह विरुद्ध जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं. संगीताचा सुरुवातीला पराभव झाला पण दुसऱ्या सामन्यात तिने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. सेमीफायनलमध्ये तिला पराभूत व्हावं लागलं. पण हंगेरीची युवा कुस्तीपट्टू व्हिक्टोरिया बोरसोसविरुद्ध कांस्य पदकासाठीच्या सामन्यात तिने विजय मिळवला. संगीताने गेल्या वर्षी 62 किलो वजनी गटात नॅशनल चॅम्पियनशिप जिंकली होती. मार्केटा वोंड्रोसोवाने रचला इतिहास; अंतिम फेरीत ओन्स जाबेरचा पराभव कांस्य पदक जिंकल्यानंतर संगीताने ट्विटर हँडलवरून भावना व्यक्त केल्या. संगीताने म्हटलं की, तुमचे अभिनंदनाचे मेसेज माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. मी या क्षणी खूप भावुक आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. हे पदक फक्त माझं नाही, तर तुम्हा सर्वांचं आहे. मी हे पदक जगातील त्या सर्व संघर्ष करणाऱ्या महिलांना अर्पण करते ज्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढत आहेत. जय हिंद. विनेश फोगाटने ऐनवेळी या स्पर्धेतून माघार घेतली. विनेशने ताप आणि फूड पॉइजनिंगचं कारण सांगत या स्पर्धेत खेळणार नसल्याचं सांगितलं. ही स्पर्धा एशियाड ट्रायल्सच्या आधी फिटनेसची चाचणी करण्यासाठी चांगलं व्यासपीठ आहे. विशेषत: त्या खेळाडूंसाठी ज्या खेळाडूंना आंदोलनामुळे ट्रेनिंग आणि सामन्यांपासून दूर रहावं लागलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.