जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Wimbledon 2023: 24 वर्षीय मार्केटा वोंड्रोसोवाने रचला इतिहास; अंतिम फेरीत ओन्स जाबेरचा पराभव

Wimbledon 2023: 24 वर्षीय मार्केटा वोंड्रोसोवाने रचला इतिहास; अंतिम फेरीत ओन्स जाबेरचा पराभव

मार्केटा वोंड्रोसोवा

मार्केटा वोंड्रोसोवा

Wimbledon 2023: प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेत 24 वर्षीय मार्केटा वोंड्रोसोवाने इतिहास रचला आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

Wimbledon 2023: झेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोसोवा हिने विम्बल्डन 2023 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी (15 जुलै) झालेल्या अंतिम सामन्यात वोंड्रोसोवाने ट्युनिशियाच्या ओन्स जेब्युरचा 6-4, 6-4 असा पराभव केला. बिगरमानांकित वोंड्रोसोवाच्या कारकिर्दीतील हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. दोन्ही खेळाडूंमधील हा सामना 1 तास 20 मिनिटे चालला. 24 वर्षीय मार्केटा वोंड्रोसोवा ही विम्बल्डन चॅम्पियन बनणारी ओपन एरामधील पहिली बिगरमानांकित महिला खेळाडू आहे. यापूर्वी 1963 मध्ये बिगरमानांकित बिली जीन किंगने फायनलमध्ये प्रवेश केला होता. परंतु, त्यानंतर तिला ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्गारेट कोर्टकडून पराभव पत्करावा लागला होता. सहाव्या मानांकित ओन्स जेब्युरला अंतिम सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. त्याचवेळी वोंड्रोसोवाने सुरुवातीपासूनच दमदार खेळ दाखवला. वोंड्रोसोवाने सातपैकी सहा वेळा जेब्युरची सर्व्हिस मोडली. दुसरीकडे, जेब्युर 10 पैकी केवळ 4 वेळा विरोधी खेळाडूची सर्व्हिस मोडू शकलr. 28 वर्षीय ओन्सने सलग दुसऱ्या वर्षी विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली, पण पुन्हा एकदा ती विजेतेपदापासून वंचित राहिली. वाचा - मराठमोळा ऋतुराज भारतीय संघाचा नवा कर्णधार; रिंकू सिंगलाही संधी, अशी आहे टीम जोकोविचचे लक्ष 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपदावर गेल्या वर्षी जेब्युरला अंतिम फेरीत कझाकस्तानच्या एलेना रिबाकिनाने पराभूत केले होते. ओन्सने यूएस ओपन 2022 च्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता, पण तिथेही तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. जागतिक क्रमवारीत 42व्या क्रमांकावर असलेल्या मार्केटाची ही दुसरी ग्रँडस्लॅम फायनल होती. 2019 फ्रेंच ओपनमध्येही मार्केटा अंतिम फेरीत पोहोचली होती, जिथे तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत रविवारी (16 जुलै) सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा सामना स्पेनच्या कार्लोस अल्कारेझशी होणार आहे. जोकोविचने उपांत्य फेरीच्या सामन्यात आठव्या मानांकित इटलीच्या यानिक सिनरचा 6-3, 6-4, 7-6 असा पराभव केला. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्कारेझने तिसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवचा 6-3, 6-3, 6-3 असा पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत आपले स्थान पक्के केले आहे. यूएस ओपन 2022 चा विजेता अल्कारेझला गेल्या महिन्यात फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत जोकोविचकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अल्कारेझ या पराभवा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. जोकोविच त्याचे 24 वे ग्रँडस्लॅम आणि एकूण आठवे विम्बल्डन विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wimbledon
  • First Published :
जाहिरात
जाहिरात