मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

लॉर्ड्सच्या मैदानावर Sam Curren चा लाजिरवाणा विक्रम, 137 वर्षांच्या इतिहासात कुणीच नाही केली अशी कामगिरी

लॉर्ड्सच्या मैदानावर Sam Curren चा लाजिरवाणा विक्रम, 137 वर्षांच्या इतिहासात कुणीच नाही केली अशी कामगिरी

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनच्या (Sam Curren) नावावर मात्र लॉर्ड्सवर गेल्या 137 वर्षांत कोणताही खेळाडू करू शकला नाही, असा एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनच्या (Sam Curren) नावावर मात्र लॉर्ड्सवर गेल्या 137 वर्षांत कोणताही खेळाडू करू शकला नाही, असा एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनच्या (Sam Curren) नावावर मात्र लॉर्ड्सवर गेल्या 137 वर्षांत कोणताही खेळाडू करू शकला नाही, असा एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

लंडन, 17 ऑगस्ट : भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील टेस्ट सामन्यांच्या मालिकेतील (Test Cricket) दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीमने इंग्लंडचा (England) 151 रन्सनी पराभव केला. लॉर्ड्सवर (Lords Cricket Ground) सात वर्षांनी भारताने इंग्लंड टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये विजय मिळवला. लॉर्ड्सच्या मैदानावर भारताने मिळवलेला हा तिसरा टेस्ट विजय आहे. यापूर्वी भारताने 1986 आणि 2014 मध्ये लॉर्ड्सवर टेस्ट सामना जिंकला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने, एमएस धोनीच्या नेतृत्वातील 2014 च्या प्रसिद्ध विजयाची पुनरावृत्ती केली आहे.

हा सामना अनेक अर्थांनी अविस्मरणीय ठरला आहे. एकीकडे भारतीय टीमच्या या रोमहर्षक विजयाने टीमच्या कामगिरीचं कौतुक होत असताना इंग्लंडच्या टीमवर मात्र नामुष्की ओढवली आहे. प्रत्येक खेळाडूला लॉर्ड्सच्या मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करायची असते, पण इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनच्या (Sam Curren) नावावर मात्र लॉर्ड्सवर गेल्या 137 वर्षांत कोणताही खेळाडू करू शकला नाही, असा एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. लॉर्ड्सवर झालेल्या या टेस्टच्या दोन्ही डावांमध्ये सॅम करन शून्यावर आउट झाला. विशेष म्हणजे दोन्ही इनिंगमध्ये तो पहिल्याच बॉलवर शून्य रन्सवर बाद झाला. यापूर्वी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर जगातील कोणताही फलंदाज दोन्ही डावांमध्ये शून्य रन्सवर बाद झाला नव्हता.

खातं उघडल्याशिवाय पहिल्याच बॉलवर बाद होणाऱ्या खेळाडूला गोल्डन डक (Golden Duck) म्हणतात आणि दोन्ही डावांमध्ये गोल्डन डक केला, तर त्याला किंग पेअर (King Payer) म्हणतात. सॅम करननं लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर किंग पेअर होण्याचा विक्रम नोंदवून चांगलीच नामुष्की ओढवून घेतली आहे. पहिल्या इनिंगमध्ये ईशांत शर्माने (Ishant Sharma) करनला आउट केलं, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) एलबीडब्लु आउट केलं.

7 वर्षांनी भारताचा लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय; या 6 गोष्टींमुळे इंडियाने जिंकली हरलेली बाजी

सॅम इंग्लंडच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील केवळ चौथा खेळाडू आहे, जो दोन्ही डावांमध्ये पहिल्या बॉलवर बाद झाला आहे. त्याच्या आधी विल्यम अ‍ॅटवेल, एर्नी हायन्स आणि जेम्स अँडरसन हे तीन खेळाडू दोन्ही इनिंगमध्ये शून्य रन्सवर बाद झाले आहेत. तर भारतीय टीमविरुद्ध चार फलंदाज दोन्ही डावांमध्ये पहिल्या बॉलवर शून्य रन्सवर बाद झाले आहेत. यापूर्वी जेम्स अँडरसन भारताविरुद्धच्या दोन्ही डावांमध्ये शून्य रन्सवर बाद झाला होता. 1981 मध्ये गॅरी टूप, 2001 मध्ये अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि 2007 मध्ये जावेद उमर हेदेखील दोन्ही डावांमध्ये शून्य रन्सवर बाद झाले होते.

अवघा 23 वर्षांचा सॅम करन अष्टपैलू खेळाडू आहे. तो असा आऊट होईल, असा विचारही कोणी केला नव्हता. 2018 मध्ये जेव्हा भारत आणि इंग्लंड टेस्ट मालिकेत आमने-सामने आले होते, तेव्हा सॅम करन हा एकमेव खेळाडू होता, ज्याने एकट्याने भारताच्या पराभवात मोलाचं योगदान दिलं होतं. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून तो खेळला आहे.

First published:

Tags: England, IND Vs ENG, India