मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

7 वर्षांनी भारताचा लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय; या 6 गोष्टींमुळे इंडियाने जिंकली हरलेली बाजी

7 वर्षांनी भारताचा लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय; या 6 गोष्टींमुळे इंडियाने जिंकली हरलेली बाजी

भारतीय क्रिकेट टीमने सोमवारी दुसऱ्या क्रिकेट टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडवर 151 रन्सनी विजय मिळवला आणि एक नवा इतिहास रचला. या आधी 7 वर्षांपूर्वी भारतीय संघाने इंग्लंडला या मैदानावर टेस्ट सामन्यात पराभूत केलं होतं.

भारतीय क्रिकेट टीमने सोमवारी दुसऱ्या क्रिकेट टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडवर 151 रन्सनी विजय मिळवला आणि एक नवा इतिहास रचला. या आधी 7 वर्षांपूर्वी भारतीय संघाने इंग्लंडला या मैदानावर टेस्ट सामन्यात पराभूत केलं होतं.

भारतीय क्रिकेट टीमने सोमवारी दुसऱ्या क्रिकेट टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडवर 151 रन्सनी विजय मिळवला आणि एक नवा इतिहास रचला. या आधी 7 वर्षांपूर्वी भारतीय संघाने इंग्लंडला या मैदानावर टेस्ट सामन्यात पराभूत केलं होतं.

लंडन, 17 ऑगस्ट : इंग्लंडमधल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडला (Lord’s Cricket Ground) क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. या ग्राउंडवर भारतीय क्रिकेट टीमने सोमवारी (16 ऑगस्ट 21) दुसऱ्या क्रिकेट टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडवर 151 रन्सनी विजय मिळवला आणि एक नवा इतिहास रचला. भारतीय टीमने लॉर्ड्सवर मिळवलेला हा टेस्ट मॅचमधील तिसरा विजय (Third Test Win) आहे. या आधी 7 वर्षांपूर्वी भारतीय संघाने इंग्लंडला या मैदानावर टेस्ट सामन्यात पराभूत केलं होतं. या दुसऱ्या टेस्टमध्ये काय होतं याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती पण भारतीय बॅट्समन आणि बॉलर यांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या बॉलर्सनी 9 व्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि ईशांत शर्माने घेतलेल्या विकेट्समुळे मॅचला कलाटणी मिळाली.

पहिले चार दिवस या मॅचमध्ये बरेचदा पारडं भारताच्या आणि इंग्लंडच्या बाजूला झुकलं होतं. पण निर्णायक 5 व्या दिवशी (5th Day of Test Match) कमाल खेळाचं दर्शन घडलं. भारताच्या तळातल्या फळीतल्या बॅट्समननी केलेली बॅटिंग आणि बॉलर्सनी इंग्लंडच्या बॅट्समनच्या आणलेले नाकी नऊ यामुळे सामन्याचा निकाल फिरला.

भारताने इंग्लंडला 272 रन्सचं लक्ष्य दिलं होतं आणि इंग्लंड संघ चौथ्या डावासाठी मैदानात उतरला पण त्यांना सुरुवातीलाच दोन झटके बसले. त्यांचे दोन्ही ओपनर लगेच बाद झाले. इंग्लडंचा स्कोअर होता 2 आउट 1 रन.

त्यानंतर इंग्लंडचा कॅप्टन जो रूटने नवोदित बॅट्समन हसीब हमीदबरोबर डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 43 रन्सची भागीदारी (Partnership) केली, पण हमीद 9 रन्सवर खेळत असताना ईशांत शर्माने त्याला एलबीड्ब्यु बाद केलं आणि चहापानापूर्वी इंग्लंडला तिसरा धक्का दिला.

IND vs ENG : लॉर्ड्सवरच्या ऐतिहासिक क्षणाचा VIDEO, सिराज स्टम्प घेऊन पळाला!

दिवसाच्या शेवटच्या सत्रात बुमराहने इंग्लंडचा कॅप्टन जो रूटला स्लिपमध्ये कॅच द्यायला भाग पाडलं आणि भारताचा कॅप्टन विराट कोहलीने तो कॅच पकडत रूटला तंबूत धाडलं. त्यावेळी इंग्लंडचा स्कोअर 5 आउट 67 रन्स असा झाला होता. त्यानंतर भारतीय बॉलर्सनी इंग्लंडच्या खेळाडूंनी टिकू दिलं नाही आणि इंग्लंड टीम 120 रन्स करून तंबूत परतली.

रविवारी 15 ऑगस्टला चौथ्या दिवशी अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला. त्यावेळी रिषभ पंत 14, तर ईशांत शर्मा 4 रन्सवर खेळत होता आणि भारताचा स्कोअर होता 6 बाद 181 रन्स. पाचव्या दिवशी हे दोन्ही बॅट्समन बाद झाल्यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी भारताची बॅटिंगची बाजू सांभाळली. या जोडीने इंग्लंडमधील टेस्ट सामन्यांतील सर्वोच्च म्हणजे 89 रन्सची भागीदारी (Record Parnership) रचली. शमीने करिअरमधलं 2 अर्धशतक झळकावलं. शमीने 70 बॉल्समध्ये 6 फोर आणि 1 सिक्स मारत नाबाद 56 रन्स केल्या. बुमराहने नाबाद 34 रन्स करत त्याला साथ दिली. भारताने 298 रन्सवर आपला डाव घोषित (Declared the inning) केला.

IND vs ENG : शिव्या-बाऊन्सर खाऊनही शमी-बुमराहची झुंज, टाळ्यांच्या गजरात स्वागत

पहिल्या डावात भारताने 364 रन्स केल्या होत्या आणि इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 391 रन्सवर बाद झाला होता. इंग्लंडला विजयासाठी दुसऱ्या डावात 272 रन्स करणं गरजेचं होतं पण त्यांची टीम 120 रन्स करून बाद झाल्यामुळे भारताने दुसरी टेस्ट मॅच 151 रन्सने जिंकली आणि इतिहास रचला. लोकेश राहुलला मॅन ऑफ द मॅच किताब देण्यात आला.

First published:

Tags: IND Vs ENG, Test cricket