मुंबई, नोव्हेंबर: टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नेहमी सोशल मीडियवर अॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. अनेकवेळा तो काही भन्नाट व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. आताही त्याने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कुत्रा लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडीओमधील(Video) कुत्र्याचा खेळ पाहून सचिन चांगलाच भारवला आहे.
सचिनने सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कुत्रा लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा ज्या पद्धतीने चेंडू पकडताना दिसत आहे ते पाहून सचिनही हैराण झाला आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत त्याने चाहत्यांना सवालही केला आहे.
सचिनने हा व्हिडीओ त्याला कुठून मिळाला हेदेखील त्याने सांगितले आहे. ''मला हा व्हिडीओ एका मित्राने फॉरवर्ड केला. हे पाहिल्यानंतर, मला असे म्हणायचे आहे की, हे जोरात पडणारे बॉल पकडण्याचं कौशल्य आहे. आपण क्रिकेटमध्ये अप्रतिम यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक आणि अष्टपैलू खेळाडू पाहिले आहेत. पण तुम्हाला काय नाव द्यायला आवडेल? '' असा सवाल त्याने कॅप्शमध्ये केला आहे.
Received this from a friend and I must say, those are some 'sharp' ball catching skills 😉 We've seen wicket-keepers, fielders and all-rounders in cricket, but what would you name this? 😄 pic.twitter.com/tKyFvmCn4v
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 22, 2021
व्हिडिओमध्ये दोन मुले घराजवळील रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहेत. मुलांनी स्टंप म्हणून लाकडाचा वापर केला आहे. दुसऱ्या टोकाकडून लहान मुलगा चेंडू फेकताच कुत्रा धावत येता अन् विकेटकिपरची कामगिरी चोखपणे बजावताना दिसतो.
1 मिनिट 17 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 62 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. तर त्याला 8 हजाराहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Sachin tendulakar, Video viral