मुंबई, 28 फेब्रुवारी : भारताचा माजी क्रिकेटर आणि मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह चंद्रपूर येथील ताडोबा अभयारण्याला भेट दिली होती. यावेळी जंगल सफारी दरम्यान त्याला बिबट्याचे दर्शन झाले. यादरम्यान सचिनने या बिबट्याचा व्हिडीओ आपल्या कॅमेरात कैद केला असून तो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो अनेक नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करत असतो. कधी तो किचनमध्ये आपल्या कुटुंबासाठी पदार्थ करताना दिसतो तर कधी भाज्यांच्या मळ्यात काम करताना दिसतो. अशातच सचिन त्याची पत्नी अंजली आणि कुटुंबासह काही दिवसांपूर्वी ताडोबा अभयारण्यात तीन दिवसांसाठी गेला होता. त्यावेळी जंगल सफारी दरम्यान त्याने अनेक प्राणी पहिले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणार क्रिकेटच्या देवाचा पुतळा सचिनने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याला जंगलात दिसलेल्या एका बिबट्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो बिबट्या कधी झाडांमागे लपताना तर कधी जंगलातून चालताना दिसत आहे. या व्हिडिओला सचिनने “लपाछपी खेळण्यात माहीर असलेल्याला तुम्ही शोधू शकता का?” असं कॅप्शन दिल आहे.
सचिनने शेअर केलेल्या या व्हिडिओला त्याचे चाहते लाईक करीत असून अनेकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.