• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Ruturaj Gaikwad च्या खांद्यावर नवी जबाबदारी; देशांतर्गत टी-20 स्पर्धेत 'या' संघाचे करणार नेतृत्व

Ruturaj Gaikwad च्या खांद्यावर नवी जबाबदारी; देशांतर्गत टी-20 स्पर्धेत 'या' संघाचे करणार नेतृत्व

Ruturaj Gaikwad

Ruturaj Gaikwad

देशांतर्गत4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्सचा(CSK) धडाकेबाज खेळाडू ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राचे नेतृत्व (Ruturaj Gaikwad)करताना दिसणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 26 ऑक्टोबर : देशांतर्गत क्रिकेट मधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सर्व राज्य संघटनांनी आपापल्या संघाची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या स्पर्धेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्सचा(CSK) धडाकेबाज खेळाडू ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राचे नेतृत्व (Ruturaj Gaikwad to lead Maharashtra in Syed Mushtaq Ali T20)करताना दिसणार आहे. आयपीएलमध्ये चौदाव्या हंगामात सर्वाधिक धावा काढत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या ऋतुराज गायकवाड याच्याकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर, अष्टपैलू नौशाद शेख संघाचा उपकर्णधार असेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांनी संघ निवडीबाबत बोलताना म्हटले, “ऋतुराज संघाचा कर्णधार असेल तर, नौशादकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल त्रिपाठी अद्यापही दुखापतीतून बरा झाला नाही. त्यामुळे त्याचा संघ निवडीसाठी विचार झाला नाही. त्याव्यतिरिक्त सिद्धेश विर व राहुल हंगरगेकर निवडीसाठी उपलब्ध नाहीत.” असे सांगत या संघात आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव याचीदेखील निवड केली गेली आहे. अशी माहिती रियाज बागवान यांनी दिली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात 4 नोव्हेंबर रोजी होईल. महाराष्ट्राचा समावेश एलिट ए गटामध्ये असून, महाराष्ट्राचा पहिला सामना तामिळनाडूशी होईल. या गटातील सर्व सामने लखनौ येथील इकाना स्टेडियमवर होणार आहेत.

  महाराष्ट्राचा संघ

  ऋतुराज गायकवाड (कर्णधार), नौशाद शेख (उपकर्णधार), केदार जाधव, यश नाहर, अझीम काझी, रणजित निकम, सत्यजित बच्छाव, तरनजीतसिंग ढिल्लों, मुकेश चौधरी, आशा पालकर, मनोज इंगळे, प्रदीप दाधे, शमशु जमा काझी, स्वप्नील फुलपगार, दिव्यांग हिंगणेकर, सुनील यादव, धनराजसिंह परदेशी, स्वप्नील गुगळे, पवन शाह, जगदीश जोप.
  Published by:Dhanshri Otari
  First published: