मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

CWG 2022: रोहितची टीम इंडियाही पाहत होती वुमन ब्रिगेडची फायनल, पण...

CWG 2022: रोहितची टीम इंडियाही पाहत होती वुमन ब्रिगेडची फायनल, पण...

टीम इंडिया

टीम इंडिया

CWG 2022: वेस्ट इंडिजविरुद्धचा अखेरचा सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह इतर भारतीय खेळाडू चक्क मोबाईल फोनवरुन हा सामना पाहत होते. बीसीसीआयनं भारतीय खेळाडू हा सामना बघतानाचा एक फोटोही ट्विट केलाय.

  • Published by:  Siddhesh Kanase
फ्लोरिडा, 08 ऑगस्ट: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात काल राष्ट्रकुल क्रिकेट स्पर्धेत महिला क्रिकेटची फायनल पार पडली. या सामन्यात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन महिला भारतीय संघावर भारी पडल्या. आणि साखळी सामन्याप्रमाणेच भारतीय संघाला हातातोंडाशी आलेला सामना अवघ्या 9 धावांनी गमवावा लागला. त्यामुळे ऑस्ट्रेलियानं सुवर्णपदक पटकावलं आणि भारताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड मानलं जात असलं तरी भारतीय संघ सुवर्णपदक पटकावेल असाही अंदाज होता. हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या भागिदारीनं सामना जवळपास जिंकलाही होता. पण अखेरच्या क्षणी भारतीय खेळाडूंनी केलेल्या हाराकिरीमुळे हा सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं झुकला. रोहित अँड कंपनीचंही वुमन ब्रिगेडसाठी चिअर अप भारतीय क्रिकेटचाहतेच नव्हे तर फ्लोरिडात वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिका खेळणारे टीम इंडियातील खेळाडूही हा सामना पाहत होते. वेस्ट इंडिजविरुद्धचा अखेरचा सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह इतर भारतीय खेळाडू चक्क मोबाईल फोनवरुन हा सामना पाहत होते. बीसीसीआयनं भारतीय खेळाडू हा सामना बघतानाचा एक फोटोही ट्विट केलाय. पण महिला संघाच्या हातून सामना निसटत असतानाचा तणाव या फोटोत स्पष्ट दिसत होता. ऑस्ट्रेलियन महिलांचं सेलिब्रेशन सुवर्णविजेत्या ऑस्ट्रेलियानं मैदानात जोरदार सेलिब्रेशन तर केलंच पण स्टेडियममधून हॉटेलवर निघतानाही ऑस्ट्रेलियन महिला बसमध्येही उत्साहात दिसल्या. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या सेलिब्रेशनचा व्हिडीओ ट्विट केलाय. ज्यात खेळाडूंसह सपोर्ट स्टाफही जल्लोष करताना दिसत आहे. 1998 साली जेव्हा पहिल्यांदा क्रिकेटचा राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश झाला तेव्हा ऑस्ट्रेलियन पुरुष संघानं रौप्यपदक पटकावलं होतं. पण यंदा मात्र ऑस्ट्रेलियन महिलांनी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हेही वाचा - CWG 2022: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये खेळली चक्क कोरोना पॉझिटिव्ह ऑस्ट्रेलियन खेळाडू हॉकी संघाला गार्ड ऑफ ऑनर   भारतीय महिला हॉकी संघानं काल न्यूझीलंडला हरवून कांस्यपदकाची कमाई केली. यावेळी सामना संपल्यानंतर भारतीय पुरुष संघानं गार्ड ऑफ ऑनर देत संघातील खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारतीय पुरुष संघानही यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत फायनलमध्ये धडक मारुन पदक पक्क केलं आहे.
First published:

Tags: Cricket, Sport

पुढील बातम्या