मुंबई, 11 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलीया यांच्यात सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरु असून सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी करताना एक मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे. यासह असा रेकॉर्ड करणारा रोहित शर्मा भारताचा 7 वा खेळाडू ठरला आहे. अहमदाबाद येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअंती ऑस्ट्रेलियाचा संघ हा 444 धावांनी आघाडीवर होता. भारताकडून सलामीसाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिलने भागीदारी करत 36 धावा केलेल्या. तिसऱ्या दिवसाचा सामना आज सुरु झाला आणि रोहित शर्मा हा संघासाठी केवळ 35 धावांचं योगदान देऊन बाद झाला. परंतु या सह रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा 7 वा आणि जगातील 28वा खेळाडू ठरला आहे. 17 हजार धावा पूर्ण करून रोहित शर्मा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, एमएस धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली या 17 हजार धावांचा टप्पा पार केलेल्या भारतीय फलंदाजांच्या यादीत आपले नाव कोरले आहे. हिटमॅनने आतापर्यंत 49 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 3365 धावा केल्या आहेत. रोहितने 241 वनडे सामन्यांमध्ये 10,882 धावा केल्या आहेत. तर टी20 च्या 148 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 3853 धावा केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.