नवी दिल्ली, 16 जुलै : भारतीय संघ 17 जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने 10 गडी राखून विजय मिळवला. त्याचवेळी दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला 100 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तरीही टीम इंडियात एका स्टार गोलंदाजाला संधी देण्यास कर्णधार रोहित शर्मा अनुकूल नाही. हा खेळाडू गोलंदाजीमध्ये निष्णात असून विराट कोहलीचा खास मानला जातो. कोण आहे हा गोलंदाज - इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद सिराजला स्थान दिलेले नाही. सिराज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचे चेंडू खेळणे कोणत्याही फलंदाजाला इतके सोपे नसते. सिराज मधल्या षटकांमध्ये खूप मारक ठरतो. कर्णधाराला जेव्हा विकेटची गरज असते तेव्हा सिराजला गोलंदाजीला आणलं जातं. किलर बॉलिंगमध्ये माहीर - मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) त्याच्या संथ चेंडूंसाठीही प्रसिद्ध आहे. त्याच्या जादुई गोलंदाजी पुढे अनेक फलंदाज नांगी टाकतात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने आपले कौशल्य दाखवले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात तो जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसारखाच घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. सिराजची लाईन आणि लेन्थ खूप चांगली असून त्याने चेंडूवर पकड कायम ठेवली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची 10 षटके पराभव आणि विजयासाठी निर्णायक ठरतात. हे वाचा - तुम्हाला कदाचित माहीत नसेल, या 5 क्रिकेटरांच्या बायका आहेत स्टार अँकर विराट कोहलीचा खास - मोहम्मद सिराज आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळतो. विराट कोहलीही आरसीबीकडून खेळतो. कोहलीच्या नेतृत्वाखाली सिराजची कामगिरी जगासमोर आली. सिराज रिव्हर्स स्विंगमध्ये उत्कृष्ट आहे आणि तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील खूप किफायतशीर असल्याचे सिद्ध झालंय. हे वाचा - IPL खेळता पण टीम इंडियाकडून खेळताना…. गावसकरांनी घेतली दिग्गजांची हजेरी भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला- मोहम्मद सिराज भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये तो भारतासाठी गेम चेंजर ठरला आहे. त्याने भारतासाठी 13 कसोटी सामन्यात 40 विकेट्स, 4 एकदिवसीय सामन्यात 5 विकेट आणि 5 टी-20 सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.