जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL खेळता पण टीम इंडियाकडून खेळताना.... गावसकरांनी घेतली दिग्गजांची हजेरी

IPL खेळता पण टीम इंडियाकडून खेळताना.... गावसकरांनी घेतली दिग्गजांची हजेरी

IPL  खेळता पण टीम इंडियाकडून खेळताना.... गावसकरांनी घेतली दिग्गजांची हजेरी

महान क्रिकेटपटू कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंची हजेरी घेतली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै : टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. खेळाडू आंतरराष्ट्रीय मालिकेच्या दरम्यान विश्रांतीची मागणी करतात. पण, आयपीएल खेळताना ही मागणी करत नाहीत? असं मत गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या सीनिअर खेळाडूंना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मालिकेच्या दरम्यान विश्रांती देण्यात आली आहे. त्यावर गावसकर नाराज आहेत. गावसकर ‘स्पोर्ट्स तक’ वर बोलताना म्हणाले की, ‘आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान खेळाडू विश्रांती घेत नाहीत. भारताकडून खेळताना त्यांना काय होतं? मी (भारतीय मॅच दरम्यान) विश्रांती घेण्याच्या खेळाडूंच्या विचारांशी सहमत नाही. तुम्ही आयपीएल दरम्यान विश्रांती घेत नाहीत, पण, भारतासाठी खेळताना विश्रांती घेता. तुम्हाला भारताकडून खेळलं पाहिजे. विश्रांती घेण्याचं बोलू नका. टी20 मध्ये एका इनिंगमध्ये फक्त 20 ओव्हर असतात. टेस्ट मॅच खेळल्यानंतर मन आणि शरिरावर फरक पडतो. पण टी20 क्रिकेट खेळल्यावर फार फरक पडत नाही,’ असे गावसकर यावेळी म्हणाले. ‘त्यांचा ग्रेड कमी  करा’ खेळाडूंना विश्रांती देण्याच्या योजनेचा बीसीसीआयनं विचार करावा, असा सल्लाही गावसकर यांनी दिला. ज्या खेळाडूंचा समावेश A ग्रेडमध्ये आहे. त्यांना चांगला पैसा मिळतो. ते अधिक व्यावसायिक क्रिकेटपटू झाले पाहिजेत, असं मत गावसकरांनी व्यक्त केलं असून ठराविक अंतरानं विश्रांतीची मागणी करणाऱ्या खेळाडूंचा ग्रेड कमी करा,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. KL Rahul - Athiya shetty लवकरच करणार लग्न! मुंबईत होणार जंगी विवाह ‘बीसीसीआयनं विश्रांती देण्याच्या धोरणाचा फेरविचार केला पाहिजे. सर्व A ग्रेडच्या क्रिकेटपटूंना खूप चांगला मोबदला मिळतो. त्यांना प्रत्येक मॅचचे पैसे मिळतात. कोणत्या कंपनीच्या एमडी किंवा सीईओला इतक्या सुट्ट्या  मिळतात हे मला सांगा? भारतीय क्रिकेट अधिक व्यावसायिक होण्यासाठी एक मर्यादा निश्चित केली पाहिजे,’ असे गावसकरांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात