मुंबई, 10 मार्च : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजंड्स विरुद्ध श्रीलंका लिजंड्स यांच्यात सामना होत आहे. या मन्यात लंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीच्या जोडीला लंकेनं लवकर बाद केलं. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चामिंडा वासच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कलुविथरानाकडे झेल देऊन बाद झाला.
सचिनने पुन्हा एकदा खिलाडुवृत्तीचं दर्शन दिलं. सचिन बाद झाला तेव्हा पंचांनीही आऊट देण्यासाठी बोट लवकर वर केलं नव्हतं. जणू त्यांना अजुनही सचिनला खेळताना बघायचं होतं. मात्र, तोपर्यंत सचिनने मैदान सोडलवं होतं आणि पंचांनीही इकडे बोट वरती करून तो बाद असल्याचा निर्णय दिला.
सचिन बाद झाल्यानंतर सेहवागही धावबाद झाला. गेल्या सामन्यात एकहाती सामना जिंकून देणाऱ्या सेहवागने 5 चेंडूत फक्त 3 धावा केल्या. त्यानंतर सिक्सर किंग युवराज सिंग चामिंडा वासच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 4.2 षटकांत भारताची अवस्था 3 बाद 19 अशी झाली होती.
Sachin Tendulkar (c) Kaluwitharana (b) Vaas
— Vinesh Prabhu (@vlp1994) March 10, 2020
Umpire doesn't give out but Sachin walks. It's 90's all over again... #RoadSafetyWorldSeries pic.twitter.com/Kwh9aGteQn
श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 138 धावा केल्या. लकेंकडून दिलशान, कलुविथराना, कपुदगेरा आणि सेनानायके यांनाच 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या. भारताच्या मुनाफ पटेलनं 4 गडी बाद केले तर झहीर खान, इरफान पठान, गोनी आणि संजय बांगर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
हे वाचा : कोरोनामुळे IPL वर टांगती तलवार, मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय