Home /News /sport /

Road Safety World Series : युवराज, पठाण बंधूंचा धमाका, फायनलमध्ये भारताचा विजय

Road Safety World Series : युवराज, पठाण बंधूंचा धमाका, फायनलमध्ये भारताचा विजय

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या फायनलमध्ये (Road Safety World Series Final) इंडिया लिजंड्सने श्रीलंका लिजंड्सचा (India Legends vs Sri Lanka Legends) 14 रनने पराभव केला आहे. युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि पठाण बंधूंनी (Pathan Brothers) केलेल्या कामगिरीमुळे इंडिया लिजंड्सने पहिलीच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज जिंकली आहे.

पुढे वाचा ...
    रायपूर, 21 मार्च : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या फायनलमध्ये (Road Safety World Series Final) इंडिया लिजंड्सने श्रीलंका लिजंड्सचा (India Legends vs Sri Lanka Legends) 14 रनने पराभव केला आहे. युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि पठाण बंधूंनी (Pathan Brothers) केलेल्या कामगिरीमुळे इंडिया लिजंड्सने पहिलीच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज जिंकली आहे. इंडिया लिजेंड्सने ठेवलेल्या 182 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 167-7 पर्यंतच मजल मारता आली. सनथ जयसूर्याने (Sanath Jayasurya) सर्वाधिक 43 रन केले, तर चिंताका जयसिंघेने 40 आणि कौशल्य वीररत्नेने 38 रनची खेळी केली. भारताकडून युसूफ पठाण (Yusuf Pathan) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर मनप्रीत गोणी आणि मुनाफ पटेलला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशानने (Tilakratne Dilshan) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या भारताची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. सेहवाग (Virender Sehwag) 10 रनवर तर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 30 रनवर आऊट झाले. सुब्रमण्यम बद्रीनाथला 7 रनच करता आले, यानंतर युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि युसूफ पठाणने (Yusuf Pathan) जोरदार फटकेबाजी केली. युवराजने 41 बॉलमध्ये 60 रन आणि युसूफ पठाणने 36 बॉलमध्ये नाबाद 62 रन केले. युवराजने 4 फोर आणि 4 सिक्स तर युसूफ पठाणने 5 सिक्स आणि 4 फोर मारले. श्रीलंकेकडून हेराथ, जयसूर्या, महरूफ आणि वीररत्नेला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाल्या. मागच्या वर्षी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती, पण कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा अर्ध्यातच रद्द करण्यात आली. यावर्षी इंडिया लिजेंड्स, श्रीलंका लिजेंड्स, दक्षिण आफ्रिका लिजेंड्स, बांगलादेश लिजेंड्स, वेस्ट इंडिज लिजेंड्स आणि इंग्लंड लिजेंड्स या टीम सहभागी झाल्या होत्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, Sachin tendulkar, Yusuf pathan, Yuvraj singh

    पुढील बातम्या