जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अपघातानंतर धमाका करण्यासाठी ऋषभ पंत तयार, सगळ्यात आधी करणार हे काम!

अपघातानंतर धमाका करण्यासाठी ऋषभ पंत तयार, सगळ्यात आधी करणार हे काम!

rishabh pant

rishabh pant

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात रस्ते अपघात झाला होता, या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रुवारी : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात रस्ते अपघात झाला होता, या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. आता पंत या दुखापतीतून सावरत आहे. त्याने सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला आहे. अपघाताच्या 2 महिन्यांनंतर पंतने मुलाखत दिली आणि त्याच्या फिटनेसवर अपडेट दिली. आपण लवकरच पुनरागमन करणार असल्याचं पंत म्हणाला. आयएएनएसला ऋषभ पंतने मुलाखत दिली. ‘मला आता आधीपेक्षा बरं वाटत आहे. मी लवकरच पूर्णपणे बरा होईन. देव आणि डॉक्टरांची कृपा आहे. मी लवकरच फिट होईन. हा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. मागच्या काही दिवसांमध्ये माझ्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आता मला आयुष्याचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे. प्रत्येक दिवशी नवीन काही मिळवण्यासाठी मला कठोर मेहनत करायची आहे,’ अशी प्रतिक्रिया ऋषभ पंतने दिली. ‘अपघातानंतर मला ब्रश करतानाही चांगलं वाटतं. सूर्यप्रकाशात उभं राहायलाही आनंद वाटतो. मी क्रिकेटला खूप मिस करतोय. मी आता स्वत:च्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे,’ असं पंतने सांगितलं. आयपीएल 2022 आधी पंतने दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांना संदेश दिला आहे. ‘मी खूश आणि आभारी आहे. माझ्या जवळपास इतके फॅन्स आहेत. टीम इंडिया आणि दिल्ली कॅपिटल्सला पाठिंबा द्या, एवढच मी चाहत्यांना सांगेन. मी लवकरच तुम्हाला खूश करण्यासाठी पुन्हा येईन,’ असं पंत म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात