Home /News /sport /

VIDEO: संयमी द्रविडचं हे रूप पाहिलं नसेल, ऋषभ पंतच्या शतकानंतर केलं असं सेलिब्रेशन की..

VIDEO: संयमी द्रविडचं हे रूप पाहिलं नसेल, ऋषभ पंतच्या शतकानंतर केलं असं सेलिब्रेशन की..

IND vs ENG 5th Test: पहिल्या दिवशी जेम्स अँडरसन आणि इतर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी 100 धावांच्या आत भारताचे 5 फलंदाज तंबूत पाठवत स्टोक्सचा निर्णय योग्य ठरवला. पण जसजशी संध्याकाळ होत गेली तसतसे चित्र बदलले.

    नवी दिल्ली, 02 जून : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतने एजबॅस्टन येथे 'वन मॅन शो' कामगिरी केली. पंतने 111 चेंडूत 146 धावांची शानदार खेळी केली. पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या दिवशी पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलाच समाचार घेतला. त्याने आपल्या खेळीत 20 चौकार आणि चार षटकार मारले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी, जेम्स अँडरसनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी 100 धावांच्या आत भारताचे 5 फलंदाज तंबूत पाठवत स्टोक्सचा निर्णय योग्य ठरवला. पण जसजशी संध्याकाळ होत गेली तसतसे चित्र बदलले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने अवघ्या 73 षटकांत 7 गडी गमावून 338 धावा केल्या होत्या. रवींद्र जडेजा 85 धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या बाजूला मोहम्मद शमी शून्यावर खेळत (IND vs ENG 5th Test) आहे. ऋषभचे प्रत्येक मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक - पंतने चार वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यावर ओव्हलच्या मैदानावर पहिले कसोटी शतक झळकावले होते. त्याने आत्तापर्यंत पाच शतके झळकावली असून त्यापैकी 4 विदेशी मैदानावर झळकावली आहेत. पंतने सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 159*, अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध 101, दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर या वर्षी नाबाद 100 आणि नंतर एजबॅस्टन येथे 146 धावा केल्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मालिकेतील शेवटच्या सामन्यात पंतने सर्व शतके झळकावली. पंत आता निर्णायक सामन्यांमध्ये मोठी खेळी खेळत आहे. याशिवाय, सामन्याचे फासे कधीही उलटवण्याची त्याची क्षमता आहे. हे वाचा - Video: नॅशनल रेकॉर्ड तोडत नीरज चोप्राचा भाला पुन्हा सुसाट; डायमंड लीगमध्ये जबरदस्त फेकी पंतच्या शतकावर राहुल द्रविडचे खास सेलिब्रेशन - इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला फक्त ही कसोटी किमान ड्रॉ करायची आहे. भारताने अखेरची कसोटी मालिका 2007 मध्ये इंग्लंडच्या भूमीवर 1-0 अशी जिंकली होती. त्यावेळी राहुल द्रविड टीम इंडियाची कमान सांभाळत होता. आता द्रविड प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. 100 धावांच्या आत पाच विकेट्स गमावल्याने टीम इंडिया अडचणीत दिसत होती. त्यानंतर पंत आणि जडेजाने 239 चेंडूत 222 धावांची भागीदारी करून द्रविडची चिंता दूर केली. पंतच्या शतकानंतर राहुल द्रविडने आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन केले. ड्रेसिंग रूममधील इतर सहकारी खेळाडूंनीही त्याचे जोरदार अभिनंदन केले. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Cricket news, Rishabh pant

    पुढील बातम्या