जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'विराट स्वत:लाच फसवतोय', पॉण्टिंगने सांगितली कोहलीच्या खराब फॉर्मची Inside Story

'विराट स्वत:लाच फसवतोय', पॉण्टिंगने सांगितली कोहलीच्या खराब फॉर्मची Inside Story

'विराट स्वत:लाच फसवतोय', पॉण्टिंगने सांगितली कोहलीच्या खराब फॉर्मची Inside Story

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2022) आरसीबीकडून (RCB) खेळताना विराटची कामगिरी निराशाजनक झाली. विराट कोहली स्वत:लाच फसवत असल्याचंही रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) म्हणाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जून : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2022) आरसीबीकडून (RCB) खेळताना विराटची कामगिरी निराशाजनक झाली. मोसमात तीन वेळा विराट गोल्डन डकवर आऊट झाला, यानंतर विराटवर जोरदार टीका झाली. विराट थकलेला वाटत असल्यामुळे त्याने विश्रांती घ्यावी आणि फ्रेश होऊन पुनरागमन करावं, असं मत अनेकांनी मांडलं. यातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगच्या नावाचाही समावेश आहे. विराट कोहली स्वत:लाच फसवत असल्याचंही रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) म्हणाला आहे. दक्षिण आफ्रिका सीरिजमधून कोहलीला विश्रांती दिग्गजांनी मांडलेल्या या मतानंतर निवड समितीनेही गांभिर्याने घेतलं. या कारणामुळे विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून विश्रांती देण्यात आली. पण इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकमेव टेस्ट मॅचसाठी विराटची टीम इंडियात निवड झाली आहे. कोहलीला मार्ग शोधावा लागेल आयसीसी रिव्ह्यूमध्ये पॉण्टिंग म्हणाला, ‘प्रत्येक खेळाडूच्या करियरमध्ये खराब फॉर्म नक्कीच येतो. विराट मागच्या 10-12 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. त्याने इतका खराब काळ बघितलेला नाही. आयपीएलमध्ये त्याला बघून सगळीकडे हेच म्हणलं जात होतं, की तो थकला आहे. मला वाटतं विराटने यावर विचार करायला हवा आणि सुधारण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा, तो टेकनिकल असेल किंवा मानसिक.’ ‘आपण थकलेलो नाही, हे सांगून आपण स्वत:लाच फसवत असतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. आपण शारिरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेलो नाही, हे आपल्याला वाटत असतं, त्यामुळे खेळाडू ट्रेनिंग आणि मॅचसाठी स्वत:ला तयार करतो, पण काही दिवसांनी तुम्हाला स्वत:लाच थकल्यासारखं वाटतं. मला कोहलीबाबतही असंच वाटत आहे, पण त्याच्याबाबतीत हे फार काळ टिकणार नाही,’ अशी प्रतिक्रिया पॉण्टिंगने दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात