मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : मॅच संपल्यावर Deepak Chahar ने मैदानातच केलं गर्लफ्रेंडला Propose, Romantic Video

IPL 2021 : मॅच संपल्यावर Deepak Chahar ने मैदानातच केलं गर्लफ्रेंडला Propose, Romantic Video

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला (CSK vs PBKS) पराभूत केलं. या मॅचमध्ये चेन्नईचा पराभव झाला असला तरी चर्चा मात्र दीपक चहरची (Deepak Chahar Propose) झाली.

  • Published by:  Shreyas
दुबई, 7 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला (CSK vs PBKS) पराभूत केलं. या मॅचमध्ये चेन्नईचा पराभव झाला असला तरी चर्चा मात्र दीपक चहरची (Deepak Chahar Propose) झाली. मॅच संपल्यानंतर दीपक चहरने स्टॅण्डमध्ये जाऊन आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं, यानंतर अवघ्या काही क्षणांमध्येच दीपक चहरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मॅच संपल्यानंतर दीपक लगेचच स्टॅण्डमध्ये गेला आणि त्याने एका गुडघ्यावर उभं राहून गर्लफ्रेंडला लग्नासाठी मागणी घातली. यानंतर स्टॅण्डमध्ये असलेल्या लोकांनीही टाळ्या वाजवल्या. गर्लफ्रेंडने जेव्हा हो म्हणलं तेव्हा दोघांनी एकमेकांना मिठी मारली. दीपक चहरने याचा एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे.
हा फोटोच सगळं काही सांगून जातो, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवे आहेत, असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. दीपक चहरला त्याचे चेन्नईच्या टीममधले सहकारी, आयपीएलमधले खेळाडू आणि चाहत्यांनीही शुभेच्छा दिल्या, तसंच त्याचं अभिनंदनही केलं. दीपक चहर चेन्नई सुपर किंग्स टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात दीपक चहरला चमकदार कामगिरी करता आली नाही. 4 ओव्हरमध्ये त्याने 48 रन दिल्या, तसंच त्याला एकही विकेट मिळाली नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये दीपक चहर टीम इंडियाच्या स्टॅण्डबाय खेळाडूंमध्ये आहे.
First published:

Tags: Csk, IPL 2021

पुढील बातम्या