जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / FIFA Club World Cup : रिअल मॅड्रिडने पाचव्यांदा फिफा क्लब वर्ल्ड कपवर कोरलं नाव

FIFA Club World Cup : रिअल मॅड्रिडने पाचव्यांदा फिफा क्लब वर्ल्ड कपवर कोरलं नाव

रिअल मॅड्रिडने पाचव्यांदा फिफा क्लब वर्ल्ड कपवर कोरलं नाव

रिअल मॅड्रिडने पाचव्यांदा फिफा क्लब वर्ल्ड कपवर कोरलं नाव

मुंबई, 12 फेब्रुवारी : रिअल मॅड्रिडने मोरोक्को येथे शनिवारी अल हिलाल संघावर 5-3 असा शानदार विजय मिळवून पाचव्यांदा फिफा क्लब वर्ल्ड कप जिंकला आहे. व्हिनिसियस ज्युनियर आणि फेडे व्हॅल्व्हर्डे यांनी प्रत्येकी दोन वेळा, तर करीम बेन्झेमाने देखील दुखापतीतून परतताना गोल करत प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळवला. जगप्रसिद्ध फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव कोरण्यात यशस्वी झाल्याने रिअल मॅड्रिड संघावर सर्वस्थरावून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या हंगामात चॅम्पियन्स लीग विजेते म्हणून पात्र ठरलेल्या कार्लो अँसेलोटीच्या बाजूने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना हाताळण्यासाठी खूप आक्रमक गुणवत्ता होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 फेब्रुवारी : रिअल मॅड्रिडने मोरोक्को येथे शनिवारी अल हिलाल संघावर 5-3 असा शानदार विजय मिळवून पाचव्यांदा फिफा क्लब वर्ल्ड कप जिंकला आहे. व्हिनिसियस ज्युनियर आणि फेडे व्हॅल्व्हर्डे यांनी प्रत्येकी दोन वेळा, तर करीम बेन्झेमाने देखील दुखापतीतून परतताना गोल करत प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळवला. जगप्रसिद्ध फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव  कोरण्यात यशस्वी झाल्याने रिअल मॅड्रिड संघावर सर्वस्थरावून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या हंगामात चॅम्पियन्स लीग विजेते म्हणून पात्र ठरलेल्या कार्लो अँसेलोटीच्या बाजूने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना हाताळण्यासाठी खूप आक्रमक गुणवत्ता होती. रबातच्या प्रिन्स मौले अब्देल्लाह स्टेडियमवर मॅड्रिडने जबरदस्त विजय मिळवला. मॅड्रिडने 1960, 1998 आणि 2002 मध्ये तीन आंतरखंडीय कप जिंकले आहेत. यात युरोपियन आणि दक्षिण अमेरिकन चॅम्पियन्समधील सामन्याचाही समावेश असून हा 2005 मध्ये क्लब वर्ल्ड कपमध्ये विलीन करण्यात आला होता. हे ही वाचा : Women T20 World Cup : आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला! कधी, कुठे पाहाल सामना?

जाहिरात

रिअल मॅड्रिड संघाचे मॅनेजर अँसेलोटीने प्रतिक्रिया देताना म्हंटले, “या विजयाने आम्ही खूप आनंदीत आहोत, आज आठव्यांदा मॅड्रिड चॅम्पियन बनले आहे”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: FIFA , football , sports
  • First Published :
जाहिरात
जाहिरात