मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'त्या तिघांच्या निवडीनंतर धक्का बसला', World Cup च्या टीमबद्दल शास्त्रींचा खळबळजनक गौप्यस्फोट

'त्या तिघांच्या निवडीनंतर धक्का बसला', World Cup च्या टीमबद्दल शास्त्रींचा खळबळजनक गौप्यस्फोट

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी 2019 वनडे वर्ल्ड कपसाठी (World Cup 2019) निवडण्यात आलेल्या टीमबाबत गौप्यस्फोट केले आहेत.

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी 2019 वनडे वर्ल्ड कपसाठी (World Cup 2019) निवडण्यात आलेल्या टीमबाबत गौप्यस्फोट केले आहेत.

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी 2019 वनडे वर्ल्ड कपसाठी (World Cup 2019) निवडण्यात आलेल्या टीमबाबत गौप्यस्फोट केले आहेत.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 10 डिसेंबर : टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी 2019 वनडे वर्ल्ड कपसाठी (World Cup 2019) निवडण्यात आलेल्या टीमबाबत गौप्यस्फोट केले आहेत. निवड समितीने वर्ल्ड कपसाठी तीन विकेट कीपरची निवड केलेली पाहून मी हैराण झालो होतो, असं शास्त्री म्हणाले. टीम इंडियाच्या निवडीबाबत आपण कधीही हस्तक्षेप केला नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. 2019 वनडे वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीमवर अनेक माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आक्षेप घेतले होते. अंबाती रायुडूची (Ambati Rayudu) वनडे वर्ल्ड कपसाठी निवड झाली नव्हती, पण वर्ल्ड कपआधी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) तो चौथ्या क्रमांकाचा खेळाडू असेल, असं सांगितलं होतं.

अंबाती रायुडू किंवा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्यापैकी एक जण तीन विकेट कीपरऐवजी टीममध्ये हवा होता, हे रवी शास्त्री यांनी मान्य केलं. टाईम्स ऑफ इंडियाला रवी शास्त्री यांनी मुलाखत दिली. 'टीम निवडीमध्ये मला कोणतेही अधिकार नव्हते, पण वर्ल्ड कपसाठी तीन विकेट कीपर निवडणं योग्य नव्हतं. अंबाती रायुडू किंवा श्रेयस अय्यर टीममध्ये पाहिजे होते. एमएस धोनी (MS Dhoni), ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हे तिन्ही विकेट कीपर एकाचवेळी टीममध्ये असण्याला काय तर्क होता?' असा सवाल शास्त्रींनी उपस्थित केला.

'मी कधीही निवड समितीच्या कामात हस्तक्षेप केला नाही, पण जेव्हा मला प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा मी उत्तर दिलं,' असं शास्त्री म्हणाले. इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी उल्लेखनीय झाली, पण न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये भारताची बॅटिंग गडगडली. 240 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा 18 रननी पराभव झाला. धोनी आणि जडेजाच्या अर्धशतकांनंतरही भारताच्या पदरी निराशा आली.

जसप्रीत बुमराहच्या टेस्ट पदार्पणावरही रवी शास्त्रींनी प्रतिक्रिया दिली. सप्टेंबर 2017 मध्ये मी बुमराहला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तयार व्हायला सांगितलं, असं शास्त्री म्हणाले. रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक असताना टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगमध्ये कमालीची सुधारणा झाली. बुमराहने भारताला घातक बॉलिंग आक्रमण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बुमराहने पहिले मर्यादित ओव्हरमध्ये नाव कमावलं, पण बॉलिंग ऍक्शनमुळे तो टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी होईल का नाही, याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली होती. बुमराहने मात्र दक्षिण आफ्रिकेत टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करून टीकाकारांची बोलती बंद केली.

केप टाऊन टेस्टमध्ये बुमराहने 4 विकेट घेतल्या, पण भारताचा 72 रननी पराभव झाला. '2017 साली मी आणि भरत अरुण दुर्गा पुजेसाठी कोलकात्यामध्ये होतो, तेव्हा मी बुमराहला फोन केला आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी तयार राहायला सांगितलं. हे ऐकून बुमराहचा विश्वासच बसला नाही. टेस्ट क्रिकेट खेळणं माझं स्वप्न आहे, असं त्याने मला सांगितलं,' अशी आठवण शास्त्रींनी सांगितली.

First published:

Tags: Ravi shastri, Team india, World cup 2019