इंदौर, 01 फेब्रुवारी : आंध्र प्रदेशचा कर्णधार हनुमा विहारीने हात फ्रॅक्चर असतानाही संघासाठी पुन्हा फलंदाजी केली. बुधवारी मध्य प्रदेशविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये तो हात फ्रॅक्चर असतानाही तो मैदानात उतरला. विहारीला सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना आवेश खानचा चेंडू लागला होता. तेव्हा ते रिटायर्ड हर्ट होऊन मैदानातून बाहेर गेला. स्कॅन केल्यानंतर मनगटाला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.
दुखापत होऊनही दुसऱ्या दिवशी हनुमा विहारीने हार न मानता पुन्हा मैदानात उतरत फलंदाजी केली. पृथ्वीराज यारा बाद झाल्यानंतर हनुमा विहारी फलंदाजीला आला. यारा बाद झालेला नववा खेळाडू होता. विहारी उजव्या हाताने फलंदाजी करतो, मात्र मनगटाला दुखापत झाल्यानं डाव्या हाताने फलंदाजी करत आहे. यामध्ये त्याने दोन चौकारही लगावले असून दुसऱ्या सत्रातला खेळ संपेपर्यंत त्याने 56 चेंडूत नाबात 27 धावा केल्या.
Hanuma Vihari
Batting LEFT handed and also more importantly just with one hand , the top hand Bravery to another level #quarterfinal#RanjiTrophy — DK (@DineshKarthik) February 1, 2023
हेही वाचा : 'मी कधीच त्यांना...', विराट कोहलीने लता दीदींविषयी व्यक्त केली खंत
मध्य प्रदेशचा कर्णधार आदित्य श्रीवास्तवने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंदौरच्या होळकर स्टेडियमवर आंध्र प्रदेशने चांगली फलंदाजी करत 1 बाद 262 धावा केल्या. मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी सामन्यात पुनरागगमन केलं आणि आंध्र प्रदेशची अवस्था 9 बाद 353 अशी झाली. यानंतर विहारी फ्रॅक्चर असतानाही फलंदाजीला आला. मध्य प्रदेश गतविजेता असून यंदाही विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. आंध्र प्रदेशने अद्याप रणजी ट्रॉफी जिंकलेली नाही.
Hanuma Vihari one handed batting due to fracture his wrist.#HanumaVihari #INDvsAUSpic.twitter.com/t9hVDTRMmY
— Drink Cricket (@Abdullah__Neaz) February 1, 2023
हनुमा विहारी भारताच्या कसोटी संघातही होता. पण भारतात होणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी अलिकडच्या काळात मिळाली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीतही विहारी दुखापतीनंतरही मैदानात उभा राहिला होता. त्याने रविचंद्रन अश्विनसोबत ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा सामना करत महत्त्वाची भागिदारी केली होती. या भागिदारीमुळे सामना अनिर्णित राहिला होता. तेव्हा 161 चेंडू खेळताना विहारीने नाबाद 23 धावा केल्या होत्या. तर अश्विनने 39 धावांची खेळी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket