Home /News /sport /

Ranji Trophy Final: LIVE सामन्यात पंचांनाच लागला चेंडू, मैदानावरच कोसळले आणि... पाहा VIDEO

Ranji Trophy Final: LIVE सामन्यात पंचांनाच लागला चेंडू, मैदानावरच कोसळले आणि... पाहा VIDEO

भरमैदानात झाला भयंकर अपघात, चेंडू लागल्यामुळं कोसळले पंच.

    राजकोट, 10 मार्च : सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy Final) अंतिम सामना होत आहे. या सामन्यात पहिल्याच दिवशी बंगाल संघाने सौराष्ट्र संघाच्या 5 फलंदाजांना बाद केले. पहिल्या दिवसा खेळ 206 धावांवर संपल्यानंतर सौराष्ट्रने चांगला कमबॅक केला. मात्र या मॅचदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. सामना सुरू असताना 84व्या ओव्हरमध्ये बंगालच्या खेळाडूंनी थ्रो केलेला चेंडू पंचांना लागला. पंचांना लागलेल्या या चेंडूमुळे पंच मैदानातच कोसळले. रणजी करंडक 2020चा अंतिम सामना सध्या राजकोटमध्ये होत आहे. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनादडकटनं फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक भयंकर प्रकार घडला. पहिल्या दिवशी मैदानावरील पंच सी श्यामसुद्दीन यांना चेंडू लागला. त्यामुळं त्यांना त्वरित मैदानाबाहेर नेले. उपचारानंतर दुसऱ्या दिवशी श्यामसुद्दीन पुन्हा मैदानात आले. मात्र या अपघातामुळे त्यांची नियुक्ती टीव्ही अम्पायर म्हणून करण्यात आली. श्यामसुद्दीन यांच्या या अपघाताचा व्हिडीओ बीसीसीआयनं ट्वीट केला होता. वाचा-Ranji Trophy फायनल खेळताना बिघडली पुजाराची तब्येत, सामना मधेच थांबवला वाचा-40 चेंडूत 99 धावा चोपणाऱ्या फलंदाजाला बाद करण्यासाठी धरले पाय, पाहा VIDEO दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ 206 धावांवर संपला. तर दुसऱ्या दिवशी अर्पित वासवडानं पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. अर्पितने आपले शतकी पूर्ण करत सौराष्ट्र संघाला चांगली आघाडी मिळवून दिली.पहिल्या दिवशी बंगालच्या गोलंदाजांनी पाच विकेट घेत संघाला बॅकफूटवर आणले. सध्या सौराष्ट्रने सामन्यात पुनरागनम करत चांगली आघाडी घेतली आहे. वाचा-टीम इंडियालाही कोरोनाचा धोका? विराटसह सर्व खेळाडूंची होणार फिटनेस टेस्ट फायनलमध्ये फलंदाजीवेळी बिघडली पुजाराची तब्येत भारताचा कसोटी संघाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा रणजी ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात सौराष्ट्रकडून खेळत आहे. सोमवारी चेतेश्वर पुजारा बंगालविरुद्ध खेळण्यासाठी उतरला पण अचानक तब्येत बिघडल्यानं त्यानं अर्ध्यातच मैदान सोडलं. पुजारने पहिल्या दिवशी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला त्याचं कारण बिघडलेली तब्येत हे होत. नेहमी तिसऱ्या क्रमांकावर पुजारा लवकर फलंदाजीला आला नाही तेव्हाच आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. सहाव्या क्रमांकावर पुजारा आला पण त्यानं फक्त 24 चेंडूत खेळले आणि त्यात 5 धावा केल्या. यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं पुजाराने पंचांना माहिती दिली. त्यानंतर पुजारा रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर आला.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Ranji trophy, Ranji trophy final

    पुढील बातम्या