मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पहिल्या डावात धावसंख्या टाय! मुंबई-महाराष्ट्र रणजी सामन्यात आता होणार काय?

पहिल्या डावात धावसंख्या टाय! मुंबई-महाराष्ट्र रणजी सामन्यात आता होणार काय?

Ranji Trophy : मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातला सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना फटका बसेल. त्यामुळे दोन्ही संघ कोणत्याही परिस्थिती विजय मिळवण्याच्या इराद्याने अखेरच्या दिवशी खेळतील.

Ranji Trophy : मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातला सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना फटका बसेल. त्यामुळे दोन्ही संघ कोणत्याही परिस्थिती विजय मिळवण्याच्या इराद्याने अखेरच्या दिवशी खेळतील.

Ranji Trophy : मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातला सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना फटका बसेल. त्यामुळे दोन्ही संघ कोणत्याही परिस्थिती विजय मिळवण्याच्या इराद्याने अखेरच्या दिवशी खेळतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 जानेवारी : रणजी ट्रॉफीच्या लीग फेरीत मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यात सामना सुरू आहे. अखेरच्या दिवशी या सामन्याचा निकाल लागला नाही तर मुंबईसह महाराष्ट्रचा रणजी ट्रॉफीतला प्रवास इथेच थांबणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या पहिल्या दोन्ही डावात समान धावा झाल्या आहेत. आता अखेरच्या दिवशी दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील.

मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या पहिल्या डावात समान म्हणजेच ३८४ धावा झाल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात महाराष्ट्राने २ बाद ५१ धावा केल्या आहेत. चौथ्या आणि अखेरच्या दिवशी दोन्ही संघांसमोर सामना जिंकण्याचे आव्हान असणार आहे. महाराष्ट्राला मोठी धावसंख्या उभा करून मुंबईचा संघ पूर्ण बाद करावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला मुंबईला सामना जिंकायचा असेल तर महाराष्ट्राला कमी धावांत रोखल्यानंतर ते आव्हान पाठलाग करून पूर्ण करावं लागेल. दोघांपैकी जो सामना जिंकेल तो संघ पुढच्या फेरीत जाईल अन्यथा दोन्ही संघांचा रणजी ट्रॉफीतला प्रवास इथेच संपेल.

हेही वाचा : रणजी ट्रॉफीत जडेजाची कमाल, तामिळनाडुच्या फलंदाजांची उडाली भंबेरी

सध्या पॉईंट टेबलमध्ये मुंबईची टीम २३ गुणांवर तर महाराष्ट्र २५ गुणांवर आहे. मुंबई - महाराष्ट्र यांच्यातला सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. यामुळे मुंबईचे २४ तर महाराष्ट्राचे २६ गुण होतील. सध्या आंध्र प्रदेश, सौराष्ट्र यांचेही २६ गुण झाले आहेत. यात सौराष्ट्र तामिळनाडुविरुद्ध पराभूत झाल्यास आणि मुंबई-महाराष्ट्र यांच्यातला सामना अनिर्णित राहिला तर आंध्र प्रदेश, सौराष्ट्र आणि महाराष्ट्र या तीन संघांचे गुण समान होतील. रणजी ट्रॉफीमध्ये एलिट ग्रुप बी मध्ये आंध्र प्रदेश आणि सौराष्ट्रनं एक सामना बोनस गुणांसह जिंकला आहे. त्यामुळे त्या निकषावर तिन्ही संघांचे गुण समान असले तरी महाराष्ट्राचं आव्हान संपुष्टात येईल. तर सौराष्ट्र आणि आंध्र बाद फेरीसाठी पात्र ठरतील.

रणजी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त दहा वेळा असं घडलंय की पहिल्या डावात दोन्ही संघांच्या धावा समान झाल्या आहेत. अलिकडे बिहार आणि सिक्कीम यांच्यातल्या सामन्यात पहिल्या डावात समान धावा झाल्या होत्या. प्लेट ग्रुपमध्ये असलेल्या या दोन्ही संघांचा सामना पाटना इथं झाला होता.

First published:

Tags: Cricket, Ranji Trophy