नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : भारतीय क्रीडा विश्वातील कामगिरीसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न (Rajiv Gandhi Khel Ratna) पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyan Chand Khel Ratna Award) म्हणून ओळखला जाईल.
'मला या पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अनेक नागरिकांनी केली होती. त्यांच्या मागणीचा आदर ठेवत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारचे नाव यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे असेल. जय हिंद! असे ट्विट मोदींनी केले आहे.
I have been getting many requests from citizens across India to name the Khel Ratna Award after Major Dhyan Chand. I thank them for their views.
Respecting their sentiment, the Khel Ratna Award will hereby be called the Major Dhyan Chand Khel Ratna Award! Jai Hind! pic.twitter.com/zbStlMNHdq — Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
खेलरत्न पुरस्काराची सुरुवात 1991-92 साली सर्व प्रथम करण्यात आली. विश्वनाथन आनंद हा या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला. सचिन तेंडुलकर, पी. गोपीचंद, अभिनव बिंद्रा, धनराज पिल्ले, मेरी कोम, राणी रामपाल, अंजू बेबी जॉर्ज, लिएंडर पेस या सारख्या दिग्गज खेळाडूंना या पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे.
Tokyo Olympics : बजरंगाची कमाल! शेवटच्या क्षणी फिरवली मॅच, सेमी फायनलमध्ये प्रवेश
हॉकीचे जादूगर म्हणून ध्यानचंद ओळखले जातात. त्यांनी 1926 ते 1949 या कालावधीमध्ये तब्बल 400 आंतरराष्ट्रीय गोल केले. 1928, 1932 आणि 1936 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या टीमचे ते सदस्य होते. खेलरत्न पुरस्काराशिवाय क्रीडा क्षेत्रीतील जीवनगौरव पुरस्कारालाही (Lifetime achievement ) पुरस्कारालाही ध्यानचंद यांचे नाव आहे. हा पुरस्कार 2002 साली सुरु करण्यात आला आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियमलाही 2002 साली ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM narendra modi, Sports