मुंबई, 15 डिसेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या दरम्यान भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने शेअर केला आहे. बांगलादेशचे प्रशिक्षक एलन डोनाल्ड हे आहेत. ते दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू असून त्यांनी २५ वर्षांपूर्वीच्या एका चुकीच्या वागण्याबद्दल राहुल द्रविडची माफी मागितली. एलन डोनाल्ड हे दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमक खेळाडुंपैकी एक होते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडुंना आपल्या वेगवान गोलंदाजीशिवाय ते स्लेजिंगनेसुद्धा त्रस्त करत असत. आता तब्बल २५ वर्षानंतर त्यांनी जाहीरपणे राहुल द्रविडची स्लेजिंगबद्दल माफी मागितली आहे. यावर राहुल द्रविडनेसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा : मांजराला त्रास देणं पडलं महागात, ब्राझील फुटबॉल कन्फेडरेशनला 1.56 कोटींचा दंड भारताचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडला १९९७ मध्ये डर्बनमधील एकदिवसीय सामन्यात एलन डोनाल्ड यांच्या स्पीड आणि स्लेजिंगचा सामना करावा लागला होता. आता दोन दशकांहून अधिक काळ गेल्यानतंर सध्या बांगलादेशचे प्रशिक्षक असणाऱ्या एलन डोनाल्ड यांनी द्रविडसोबत केलेल्या चुकीच्या वागण्यासाठी माफी मागितली आहे. तसंच डोनाल्ड यांनी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला डीनरसाठी बोलावलं आहे.
सोनी स्पोर्ट नेटवर्कसोबत एका मुलाखतीत डोनाल्ड यांनी डर्बनवर एकदिवसीय सामन्यात राहुल द्रविडचे स्लेजिंग करताना मर्यादा ओलांडल्याचं म्हटलं. डर्बनमध्ये एक खूप वाईट घटना घडली होती, मला त्याबद्दल बोलायचं नाही. राहुल आणि सचिन आम्हाला त्रास देत होते. मी मर्यादा ओलांडल्या होत्या. राहुलसाठी माझ्याकडे आदराशिवाय काहीच नाही. मला त्याच्यासोबत बाहेर जाऊन बसायचं आहे. त्या दिवशी जे झालं त्यासाठी मला पुन्हा माफी मागायची आहे. मला असं काही करायचं होतं ज्यामुळे त्यांची विकेट निघेल. पण मी त्यादिवशी जे काही बोललो त्यासाठी आता माफी मागतो. हेही वाचा : तरुण खेळाडुंनी विराटकडून शिकावं; एका धावेवर बाद झाल्यावरही राहुल द्रविडने केलं कौतुक एलन डोनाल्ड यांनी माफी मागितल्याचा व्हिडीओ राहुल द्रविडला मुलाखतीवेळी दाखवण्यात आला. यावर राहुल द्रविडने एलन डोनाल्ड यांच्या डीनरच्या आमंत्रणावर प्रतिक्रिया देताना हसत हसत म्हटलं की, ‘नक्कीच, मी तयार आहे. जर यासाठी खर्च ते करणार असतील.’ राहुल द्रविड आणि डोनाल्ड हे सध्या भारत, बांगलादेशच्या कोचिंग स्टाफचा भाग आहेत. दोघेही आपआपल्या संघांसोबत पहिल्या कसोटी सामन्याच्या ठिकाणी आहेत. सध्याची कसोटी मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिय़नशिपच्या फायनलमध्ये खेळण्यासाठी भारताला या कसोटी मालिकेसह इतर कसोटी सामनेही जिंकावे लागतील.