दिल्ली, 19 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ६ विकेटने दणदणीत विजय मिळवला. अश्विन आणि जडेजाच्या फिरकीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात ११३ धावात गारद केलं. या सामन्यात अश्विनला स्टिव्ह स्मिथ घाबरल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नॉन स्ट्राइकवर असलेल्या फलंदाजाला बाद करण्याची भीती फलंदाजांच्या मनात आहे. अश्विन गोलंदाजीला येतो तेव्हा फलंदाज आपण क्रीजमधून बाहेर नाही याची काळजी घेताना दिसतात. दिल्ली कसोटीत अश्विनने दोन वेळा नॉन स्ट्राइकवर असलेल्या फलंदाजाला घाबरवलं. पहिल्या डावावेळी त्याने लॅब्युशेनला तर दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथला अश्विनने घाबरवलं. यावेळी विराट कोहलीला हसू आवरलं नाही. हेही वाचा : विराटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावा, मोडला सचिनचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या १५ व्या षटकावेळी स्टिव्ह स्मिथ नॉन स्ट्राइकला उभा होता. त्यावेळी अश्विनने चेंडू टाकण्याची अॅक्शन केली पण टाकला नाही आणि थोडा मागे वळला. तेव्हा नॉन स्ट्राइकला असलेला स्मिथ पुढे लगेच क्रीजमध्ये आला. पण यानंतर विराट कोहलीला हसू आवरलं नाही. विराटने टाळ्या वाजवत अश्विनच्या या अॅक्शनवर प्रतिक्रिया दिली.
स्टिव्ह स्मिथला दोन्ही डावात अश्विनने बाद केलं. दुसऱ्या डावात तो ९ धावांवर पायचित झाला. अश्विन आणि जडेजाच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. अश्विनने १६ षटकात ५९ धावा देत तीन गडी बाद केले तर जडेजाने १२.१ षटकात ४२ धावात ७ विकेट घेतल्या.